शेतकरी एल्गार मोर्चाला घोंसा-वागदरा क्षेत्रातून शेकडो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा…
📍 वणी | सिटी हब मीडिया
नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक शेतकरी एल्गार मोर्चाला घोंसा-वागदरा जिल्हा परिषद क्षेत्रातून शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व मित्रपक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार कॉ. सुहास झाडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.
शासनाने मोर्चानंतर 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य किसान सभेने तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत जर संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा झाले नाही, तर आंदोलन पुन्हा पेटविण्याचा इशारा कॉ. सुहास झाडे यांनी दिला.
घोंसा येथील शिवाजी महाराज चौकात झालेल्या शेतकरी प्रदर्शनात बोलताना कॉ. झाडे म्हणाले की “सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर महाराष्ट्र राज्य किसान सभा पुन्हा लाल झेंडा घेऊन रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लाल झेंडा सदैव संघर्षरत राहील.”
तसेच, घोंसा-वागदरा गटात भाकपला विजय मिळाला तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेसाठी सर्व योजना आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी मोर्चास पाठींबा देण्यासाठी निलेश झाडे, रविंद्र ढेंगळे, नितीन ढेंगळे, वसंता पानघाटे, मारोती दरेकार, अमोल वाभीटकर, प्रमोद गाढवे, दयानंद गोरे, प्रविण झाडे, ज्ञानेश्वर झाडे, गुलाब डाहुले, योगेश झाडे, गजानन बोधाने, ईश्वर मुसळे, रमेश विधाते, रूपेश झाडे यांच्यासह घोंसा-बोर्डा परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
📢 मुख्य मुद्दे:
नागपूर एल्गार मोर्चात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग
शासनाचे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन
आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
भाकपचा “लाल झेंडा” शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सज्ज

























