Homeमहाराष्ट्रविकासदृष्टी असलेला कणखर नेता हरपला; वणीमध्ये अजित पवारांना भावपूर्ण सर्वपक्षीय श्रद्धांजली!

विकासदृष्टी असलेला कणखर नेता हरपला; वणीमध्ये अजित पवारांना भावपूर्ण सर्वपक्षीय श्रद्धांजली!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

‘अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही’  वणीतील शोकसभेमध्ये सर्वपक्षीय भावना व्यक्त…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, वणी शहरातील टिळक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित शोकसभेमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेमध्ये एकच सूर उमटला की, विकासाची दृष्टी, स्पष्ट भूमिका आणि जनतेशी नाते असलेला अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही.

शोकसभेमध्ये उबाठा शिवसेनेचे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,“अजित पवार यांच्याशी माझा २५ वर्षांचा जुना सहवास होता. राष्ट्रवादीत असताना त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात काम केले. ते कार्यकर्त्यांना ओळखत होते, आपुलकीने वागत होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली होती. इतका मोठा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी असून, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.”

यावेळी त्यांनी आठवण सांगितली की त्यांच्या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी अजित दादा स्वतः वणीला आले होते. तसेच एकदा कोणालाही न सांगता अजित दादा गुप्तपणे त्यांच्या घरी आले, जेवण करून निघून गेले. हा त्यांचा अत्यंत साधेपणा आणि आपुलकीचा गुप्त दौरा होता, अशी आठवण संजय देरकर यांनी सांगितली.

 माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की २०१४ ते २०२४ या काळात त्यांचे अजित पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. निधीसाठी गेल्यावर ते स्पष्टपणे सांगायचे की इतकाच निधी मिळेल; मात्र वणीसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही.

अजित दादा जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा ताण यायचा. त्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारला योग्य तयारी करूनच बोलावे लागायचे. अजित दादा विधानसभेमध्ये आठ–आठ तास बसून काम करत होते. त्यांचा राजकीय अभ्यास अत्यंत सखोल होता. त्यांच्याकडे विकासात्मक दृष्टी होती आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते विधानसभेमध्ये येत होते. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचीही घाम फोडत होती. आज त्यांना श्रद्धांजली देताना अजित दादा आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगताना ते भावूक झाले होते.

 शिवसेना शिंदे गटाचे संघटन मंत्री विजय चोरडिया यांनी सांगितले की अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. ते फक्त महायुतीचे नेते नव्हते, तर संपूर्ण भारताचे नेते होते. त्यांच्याकडे रचनात्मक व विकासात्मक दृष्टी होती आणि त्याच दृष्टीकोनातून त्यांचे कार्य सुरू होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी सांगितले की अजित दादांची काम करण्याची शैली अशी होती की युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत होता. उकणी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यावर ते स्वतः वणीमध्ये आले आणि अधिकाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष मोहितकर यांनी सांगितले की अजित पवार यांना वणीतील मुक्तांगण निसर्गरम्य परिसराच्या उद्घाटनासाठी बोलवण्याचा त्यांचा मानस होता; मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

काँग्रेस नेते देविदास काळे यांनी सांगितले की अजित दादांसारखा जनतेसाठी झटणारा, स्पष्ट बोलणारा नेता पुन्हा होणे शक्य नाही.

शोकसभेमध्ये उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून अजित पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.

याप्रसंगी भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. सुत्रसंचलन भाजपचे शहराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए