HomeAgroवणीकरांनो, तुमचा प्लॉट एकदा जाऊन तपासा! गाफील राहू नका… तुमची जमीन...

वणीकरांनो, तुमचा प्लॉट एकदा जाऊन तपासा! गाफील राहू नका… तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर होऊ शकते!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणीत जमीन व्यवहारातील मोठा गैरप्रकार उघड; पत्रकाराच्या तक्रारीनंतर प्लॉट घोटाळा चर्चेत…

वणी शहरात जमीन व प्लॉट व्यवहारांमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून निष्पाप नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणात महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.कारण एसडीओ साहेबांनी चक्क आरोपी तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करू नये यासाठी वणी पोलिसांना पत्र लिहले आहे…

 

या प्रकरणातील तक्रारदार सूरज चाटे हे वणीतील स्थानिक पत्रकार असून, त्यांनी स्वतःसोबत झालेल्या फसवणुकीविरोधात न्यायासाठी लढा उभारला आहे.

नेमके प्रकरण काय?

माहितीनुसार, वणी परिसरातील एका प्लॉटचा व्यवहार कायदेशीर असल्याचे दाखवून सूरज चाटे व संध्या तरवटकर यांनी नोंदणीकृत खरेदीद्वारे तो प्लॉट घेतला होता. संबंधित जागेचा सातबारा शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे कागदपत्रांमध्ये दिसत होते.

मात्र काही दिवसांनी या व्यवहाराबाबत गंभीर शंका निर्माण झाली. मूळ मालकाच्या वारसांना या विक्रीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले. त्यांनी कोणतीही अधिकृत विक्री किंवा परवानगी दिलेली नसताना जमीन दुसऱ्याच्या नावावर कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच सातबारा उतारा व फेरफार नोंदींमध्ये बदल कोणाच्या मदतीने आणि कोणत्या प्रक्रियेतून झाले, याबाबतही संशय व्यक्त होत आहे.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस कसा आला?

मूळ मालकाच्या वारसांनी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांना संबंधित प्लॉट इतर व्यक्तीच्या नावावर गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली असता संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे पुढे आले.

दुसरीकडे, सर्व कागदपत्रे कायदेशीर असल्याच्या विश्वासावर पैसे गुंतवणारे पत्रकार सूरज चाटे यांनाही आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे लक्षात आले.

पोलिसांकडून टाळाटाळ; पत्रकारांचे आंदोलन…

या प्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी सूरज चाटे यांनी वणी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे वारंवार पाठपुरावा केला. मात्र सुरुवातीला पोलिसांकडून तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला.

यानंतर वणीतील समस्त पत्रकारांनी एकत्र येत वणी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. पत्रकारांनी जोरदार भूमिका घेत पोलिस प्रशासनावर दबाव निर्माण केला. अखेर पोलिसांना या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा लागला.

आरोपींवर गुन्हे दाखल; काही जण फरार…

या प्रकरणात संबंधित संशयित व्यक्ती व काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस कारवाईच्या भीतीने काही संशयित सध्या फरार असल्याचे सांगितले जात असून, वणी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा…

या घटनेनंतर वणी परिसरातील जमीन व्यवहारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी मालमत्ता खरेदी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:

७/१२ व ८-अ उतारा प्रत्यक्ष तपासा.

मूळ मालकाची खात्री महसूल कार्यालयातून करा.

व्यवहारानंतर फेरफार नोंदी तपासून घ्या.

प्लॉटवर नाव व मोबाईल नंबर असलेला बोर्ड लावा.

शक्य असल्यास जागेला कुंपण घाला.

वेळोवेळी जागेची प्रत्यक्ष पाहणी करा.

वणीतील हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा इशारा मानला जात असून, मालमत्ता व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए