Homeमहाराष्ट्रऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट आक्रमक; २० मे रोजी देशव्यापी लाक्षणिक संप! वणीसह...

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट आक्रमक; २० मे रोजी देशव्यापी लाक्षणिक संप! वणीसह यवतमाळ जिल्ह्यात औषध दुकाने राहणार बंद; ग्राहकांना आजच औषधे खरेदी करण्याचे आवाहन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

ऑनलाईन औषध विक्रीला तीव्र विरोध करत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन (MSCDA) च्या वतीने २० मे रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली आहे. या संपाला पाठिंबा देत यवतमाळ जिल्हा आणि वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने वणी परिसरातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

मुख्य मागण्या काय आहेत?

केमिस्ट असोसिएशनने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

१. ऑनलाईन औषध विक्री त्वरित बंद करा: ऑनलाईन औषध विक्री संदर्भातील GSR 817 (दि. २८.०८.२०१८) कायदा मागे घेण्यात यावा.

२. अनधिकृत डिस्काउंटला लगाम: कॉर्पोरेट्स कंपन्यांद्वारे दिली जाणारी अव्यवसायिक आणि अवाजवी सूट बंद करण्यात यावी.

३. देशाला बनावट औषधांपासून वाचवा: कोविड काळातील GSR 220 (दि. २६.०३.२०२०) हा कायदा मागे घेऊन बनावट औषधांच्या पुरवठ्यावर कडक बंदी घालावी.

रुग्णांच्या जिवाशी खेळ आणि सामाजिक संकट!

वणी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण उरकुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “ऑनलाईन औषधे खरेदी करणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या औषधांची गुणवत्ता, एक्सपायरी डेट आणि दुष्परिणामांची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. याशिवाय, अंमली पदार्थांचे वर्गीकरण असणारी ‘नारकोटिक औषधे’ (Narcotic Medicines) ऑनलाईन सहज उपलब्ध होत असल्याने आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीची (Prescription) पडताळणी होत नसल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, जे मोठे सामाजिक संकट आहे.” तसेच ऑनलाईन व्यवसायामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्राहकांना आवाहन: आजच औषधे खरेदी करा!

हा संप केवळ एक दिवसाचा लाक्षणिक संप असून, शासनाने योग्य कारवाई न केल्यास भविष्यात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे. संपाच्या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून सर्व नागरिकांनी आणि वैद्यकीय ग्राहकांनी आपली जीवनावश्यक औषधे १९ मे रोजीच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. रुग्णांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए