Homeक्राइमवणीत शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ४...

वणीत शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ४ गुन्हे उघड!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी शहर आणि परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातून बोकड व शेळ्या चोरून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतर-जिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील तीन सराईत चोरांना बेड्या ठोकल्या असून, त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. आरोपींकडून चोरीची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे वणी, पारवा आणि वडकी परिसरातील चोरीचे ४ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जत्रा मैदान परिसरात पोलिसांनी रचला सापळा…

वणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेळी चोरीच्या (अपराध क्र. ३७३/२०२६) गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीतील संशयित वणी येथील जत्रा मैदान परिसरात दबा धरून बसले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तातडीने जत्रा मैदान परिसरात वेढा टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

सीताराम आसाराम भिसे (वय २४ वर्षे, रा. गोकुळ नगर, वणी)

सुनील रामप्रसाद साळुंखे (वय २७ वर्षे, रा. गोकुळ नगर, वणी)

संजय राजू वायकर (वय २३ वर्षे, रा. गोकुळ नगर, वणी)

सचीन वायकर (रा. वणी) — हा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

२ वर्षांपासून सुरू होता चोऱ्यांचा सिलसिला…

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर, त्यांनी सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत वणी शहरासह ग्रामीण भागातील शेतांमधून अनेक शेळ्या चोरल्याचे मान्य केले. चोरलेल्या या शेळ्या ते वेगवेगळ्या ठिकाणच्या आठवडी बाजारात नेऊन विकत असत.

मुख्य आरोपी सुनील साळुंखे याच्याकडून पोलिसांनी शेळ्या विकून आलेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (क्र. MH-29-BE-8012, किंमत अंदाजे ३ लाख १० हजार रुपये) जप्त केले आहे.

इतर पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघड…

या टोळीच्या अटकेमुळे वणी परिसराव्यतिरिक्त इतर भागांतील चोऱ्यांचाही छडा लागला आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार:

१. पोलीस ठाणे पारवा: अपराध क्रमांक ०३/२०२६ मधील चोरी उघड.

२. पोलीस ठाणे वडकी: अपराध क्रमांक ४८६/२०२४ आणि ६६२/२०२४ मधील चोऱ्यांचे गुन्हे उघड झाले आहेत.

या पथकाने केली कामगिरी…

ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज ढाके, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पितुळकर, पोका सलमान शेख आणि चालक पोहवा नरेश राऊत यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए