Homeक्राइमघाण टाकून नजर विचलित करून केली ५० हजारांची रोख रक्कम लंपास; वणी...

घाण टाकून नजर विचलित करून केली ५० हजारांची रोख रक्कम लंपास; वणी येथील गांधी चौकातील घटना!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

बँकेतून मोठी रक्कम काढून निघालेल्या एका व्यक्तीचे लक्ष विचलित करून, दुचाकीवर ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवल्याची खळबळजनक घटना वणी शहरात घडली आहे. हा प्रकार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गजबजलेल्या गांधी चौक भागात दिवसाढवळ्या घडला.

नेमके काय घडले?

लालगुडा येथील रहिवासी शंकर धोटे हे काही कामासाठी वणी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत आले होते. त्यांनी बँकेतून ५० हजार रुपयांची नगद रक्कम काढली आणि ती एका पिशवीत भरली. त्यानंतर ही पिशवी आपल्या दुचाकीच्या हँडलला अडकवून ते बाजारपेठेकडे निघाले. मात्र, बँकेपासूनच काही अज्ञात चोरटे त्यांच्या मागावर होते.

अंगावर घाण टाकून साधली संधी…

गांधी चौकातील देवडे किराणा दुकानाजवळ पोहोचले असता, चोरट्यांनी धोटे यांचे लक्ष विचलित करण्यासाठी एक जुनी युक्ती वापरली. त्यांनी धोटे यांच्या अंगावर (शर्टवर) काहीतरी घाण टाकली. अंगावर घाण पडल्याचे लक्षात येताच धोटे यांनी आपली दुचाकी थांबवली आणि ते शर्ट स्वच्छ करू लागले. धोटे यांचे लक्ष विचलित झाल्याची सुवर्णसंधी साधत, दबा धरून बसलेल्या चोरट्याने अत्यंत चलाखीने दुचाकीच्या हँडलला टांगलेली पैशांची पिशवी काढली आणि तिथून पळ काढला.

चोरट्याची करामत सीसीटीव्हीत कैद…

शर्ट साफ केल्यानंतर धोटे यांचे दुचाकीकडे लक्ष गेले असता, पैशांची पिशवी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरचौकात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे पोलीस आता संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत.सीसीटीव्ही मध्ये  चोरी करणारा अल्दपवयीन आहे असे दिसत आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन…

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. बँकेतून किंवा इतर ठिकाणाहून मोठी रक्कम घेऊन प्रवास करताना नागरिकांनी अत्यंत सावध राहावे. वाटेत कोणी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा लक्ष विचलित करण्याचा प्रकार घडल्यास आधी पैशांची सुरक्षा करावी आणि अशा वेळी थेट घरी किंवा सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घटनेचा सीसीटीव्ही विडिओ…

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए