Homeक्राइमकानून के लंबे हाथ... "राग, सूड आणि जंगलात खून! मारेगाव पोलिसांनी २४...

कानून के लंबे हाथ… “राग, सूड आणि जंगलात खून! मारेगाव पोलिसांनी २४ तासांत शोधला सुगावा!”

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

मारेगाव व शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! जंगलात सापडलेल्या कुजलेल्या मृतदेहाचे गूढ २४ तासांत उकलले; ३ आरोपी गजाआड…

 मारेगाव  तालुक्यातील दांडगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, मारेगाव पोलिसांनी आपल्या उत्कृष्ट तपास कौशल्याच्या जोरावर अवघ्या २४ तासांत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. मृताची ओळख पटवून पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

मार्डा धरणाच्या जंगलात आढळला होता मृतदेह…

५ जून रोजी मार्डा धरण परिसरातील जंगलात, गौतम ठमके यांच्या शेताशेजारील एका खड्ड्यात एक कुजलेला मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. शरीराची दुरवस्था झाल्यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते. मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तातडीने मर्ग दाखल केला. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

अशी पटली मृताची ओळख…

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शोध घेताना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी गावात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. तेथील नागरिकांनी आणि नंतर नातेवाईकांनी कपडे व वस्तूंच्या आधारे मृत व्यक्ती ही विनोद प्रल्हादराव सहारे (वय ३५, रा. मरेगाव,ता.सिंदेवाही जि. चंद्रपूर) असल्याचे स्पष्ट केले.

बहिणीला त्रास देणाऱ्याला गाठले; ‘असा’ रचला खुनाचा कट…

तपास पथकाने गोपनीय माहिती गोळा करून संशयाच्या आधारे तीन जणांना ताब्यात घेतले. यात प्रवीण अशोक वरधने (रा. आपटी), राजू नथ्थुजी ढेंगळे (रा. दांडगाव) आणि शंतनू झाडे (रा. नागरी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मृत विनोद सहारे हा मुख्य आरोपीच्या बहिणीला वारंवार मानसिक त्रास देत होता. याच रागातून आरोपींनी विनोदला वरोरा येथून दुचाकीवर बसवून मार्डा धरण परिसरातील निर्जन जंगलात आणले. तिथे त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खड्ड्यात फेकून दिला.

पोलीस पथकाचे कौतुक…

या प्रकरणी सहाय्यक फौजदार दिगंबर किनाके यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनावर यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद जिद्देवार, दिगंबर किनाके, सागर दीपेवार, राजन इसंकर, इकबाल शेख आणि अजय वाभिटकर यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कारवाई केली. एका अंधाऱ्या गुन्ह्याचा काही तासांतच छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमीमध्ये एआई इमेज चा वापर केला आहे…

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए