HomeAgroनिसर्गाचा अंगावर काटा आणणारा कोप!चिखली टाकळी गावात वीज पडून पशुपालकासह १३ मुक्या...

निसर्गाचा अंगावर काटा आणणारा कोप!चिखली टाकळी गावात वीज पडून पशुपालकासह १३ मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

तालुक्यातील चिखली टाकळी भागात निसर्गाने अत्यंत क्रूर रूप धारण केल्याची थरारक घटना समोर आली आहे. वादळी पावसाच्या तडाख्यात थेट अंगावर वीज कोसळल्याने एका कष्टकरी पशुपालकाला आपली जीवनयात्रा संपवावी लागली, तर त्याच्यासोबत असलेल्या १३ निष्पाप शेळ्यांचाही जागीच कोळसा झाला. चिखली टाकळी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी दुपार…

चिखली टाकळी गावात राहणारे विलास तुमराम हे दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळच्या सुमारास आपली गुरेढोरे घेऊन जंगलाच्या दिशेने गेले होते. दुपारच्या वेळी अचानक वातावरणात मोठा बदल झाला. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली. विलास हे स्वतःला आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असतानाच, अचानक एका मोठ्या आवाजासह आकाशातून थेट त्यांच्यावर वीज कोसळली.

हा निसर्गाचा आघात एवढा भीषण होता की, विलास यांच्यासह त्यांच्या भोवती असलेल्या १३ शेळ्यांना वाचण्याची साधी संधीही मिळाली नाही. सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

एका झटक्यात संसार उघड्यावर…

मृत विलास हे आपल्या घराचे एकमेव कमावते आणि मुख्य आधारस्तंभ होते. शेळीपालनाच्या जीवावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु, निसर्गाच्या एकाच फटक्यात त्यांचा जीव तर गेलाच, सोबतीला त्यांच्या जगण्याचे साधन असलेल्या १३ शेळ्याही दगावल्या. या भीषण दुर्घटनेमुळे एका गरिबाचा हसताखेळता संसार काही क्षणात होत्याचा नव्हता झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला सरकारने तातडीने आणि मोठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए