सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहरालगतच्या गणेशपूर परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील रहिवासी **प्रशांत सुरेश सहारे (वय ४० वर्षे)** यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गणेशपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…

**घरात घेतला गळफास**
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सहारे हे विवाहित होते. त्यांनी अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरात छताच्या सिलिंगला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
**पोलीस चौकशी सुरू**
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे गूढ उकलण्यासाठी कुटुंबीय आणि निकटवर्तीयांची चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.



























