Homeक्राइमवणीत ड्रग्स येतंय कुठून? आज चार ड्रग्स तस्कर अटकेत, आता मुळावर घाव...

वणीत ड्रग्स येतंय कुठून? आज चार ड्रग्स तस्कर अटकेत, आता मुळावर घाव घालण्याची आवश्यकता!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणीत एम.डी. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; वणी पोलिसांची मोठी कारवाई, चौघांना अटक…

 यवतमाळ जिल्ह्यातील अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मोठ्या एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा यशस्वी उलगाडा करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण १९.२७ ग्रॅम एम.डी. पावडर आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ४९ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गणेशपूर रोडवर मध्यरात्री छापा यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदाराकडून एक अत्यंत विश्वसनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १९ जून २०२६ रोजी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास गणेशपूर रोड परिसरात सापळा रचून कायदेशीररीत्या छापा टाकला.

अंगझडतीत सापडले ड्रग्ज; आरोपींची नावे उघड या छाप्यादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय २८ वर्ष, रा. तेलीफैल, वणी) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे एका प्लास्टिक पाऊचमध्ये १९.२७ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित ‘एम.डी.’ (MEPHEDRONE) हा अमली पदार्थ आढळून आला, ज्याची बाजारपेठ किंमत १ लाख ३४ हजार ८९० रुपये आहे. तसेच त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल जप्त करण्यात आला.

गोलू मेश्रामची सखोल चौकशी केली असता, त्याने हा माल प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे (वय २७ वर्ष, रा. तेलीफैल, वणी, ह.मु. नागपूर) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. या दोन्ही मुख्य आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५१४/२०२६, कलम ८(C), २१(B), २१ एन.डी.पी.एस. (NDPS) ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासात इतर तीन साथीदार गजाआड या कारवाईच्या पुढील तपासादरम्यान, एम.डी. पदार्थ विक्रीच्या आधीच्या एका गुन्ह्यात (अप क्र. ४७९/२०२६) सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) प्रज्योत महेश उपरे (वय २७ वर्ष, रा. तेलीफैल, वणी)

२) अविनाश विजय पाटील (वय ४२ वर्ष, रा. छोरिया ले-आउट, वणी)

३) रविंद्र धनराज गुप्ता (वय ३४ वर्ष, रा. रंगनाथ नगर, वणी)

नागरिकांना पोलिसांचे आवाहन वणी पोलिसांतर्फे शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, परिसरात एम.डी. किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या विक्री अथवा सेवनाबाबत काहीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.

या पथकाने पाडली कामगिरी सदर धडक कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (पांढरकवडा/वणी) रॉबिन बन्सल, आणि वणीचे ठाणेदार (पो.नि.) भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी साजिद सय्यद, पोउपनी सुयोग महापुरे, पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पोपुलवार, गणेश मेश्राम, अरविंद बुच्चे, मिथुन राऊत, श्याम राठोड आणि निलेश आडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए