Homeक्राइमवणीत महिलांची 'आकड्यांची बाजीगरी': 'नागो, मोदी, लंगड्या'च्या कोडवर्ड आड दडलंय मटक्याचं जीवघेणं...

वणीत महिलांची ‘आकड्यांची बाजीगरी’: ‘नागो, मोदी, लंगड्या’च्या कोडवर्ड आड दडलंय मटक्याचं जीवघेणं व्यसन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

घराची विस्कटलेली घडी बसवणारी, कष्टाने संसार सांधणारी ‘स्त्री’ जेव्हा झटपट पैसा मिळवून देणाऱ्या जुगाराच्या आहारी जाते, तेव्हा फक्त एक घर नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर लागते. वणी शहरात सध्या असंच काहीसं धक्कादायक चित्र समोर येत आहे. एरवी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या ‘मटका’ व्यवसायात आता महिलांची, विशेषतः रोजमजुरी करणाऱ्या कष्टकरी महिलांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. त्यांच्या आपसातील संभाषणाचे कोडवर्ड ऐकून भलेभले चक्रावून जातील, अशी ‘आकड्यांची बाजीगरी’ सध्या वणीतील गल्लीबोळांत पाहायला मिळत आहे.

नागो, मोदी, टकला’… कोडवर्डची अजब दुनिया!

काही दिवसांपूर्वी वणीतील एका जागेवरून फेरफटका मारत असताना दोन महिला आपसात चर्चा करताना दिसल्या. एकीने विचारले, *”आज आलं?”* त्यावर दुसरीने उत्तर दिले, *”नागो, मोदी, मेंढी!”* ऐकून पहिली म्हणाली, *”आज जमलं नाही, दिवस बरोबर नव्हता…”* ऐकणाऱ्याला वाटेल की त्या आपल्या घरपरिवारातील काहीतरी खाजगी चर्चा करत आहेत आणि कोणाला समजू नये म्हणून ही सांकेतिक भाषा वापरत आहेत.

परंतु, दुसऱ्या दिवशी त्याच जागी महिलांचा एक मोठा ग्रुप जमला होता आणि तिथे ‘टकला, लंगडा, चॉकलेट’ अशा शब्दांचा सर्रास वापर होत होता. परिसरातील एका दुकानदाराकडे याबद्दल विचारणा केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. तो दुकानदार हसून म्हणाला, *”काय भाऊ, तुम्हाला समजलं नाही? या सर्व बाया मटक्याच्या आकड्यांबद्दल बोलत आहेत! आज कुठला आकडा फसला, आज काय आलं, आज किती पैसे लावले… यावर त्यांची ही चर्चा आहे.”*

कमी शिकलेल्या, रोजमजुरी करणाऱ्या या महिला दिवसाची मजुरी मिळताच अतिशय मन लावून या आकड्यांची जोडतोड करतात आणि एक आकडा ‘फिक्स’ करून आपला डाव लावतात. या बायांनी स्वतःची एक वेगळीच डिक्शनरी तयार केली आहे:

 * **एक्का** – १, **मोदी** – २, **तीर्री** – ३, **चॉकलेट** – ४

 * **वामनराव** – ५, **लंगडा** – ७, **टकला** – ८, **नागो** – ९, **मेंढी** – १०

 ‘इजी मनी’चं घातक व्यसन…

सकाळपासून रात्रीपर्यंत कुठला आकडा फसला याची वाट पाहिली जाते. १० रुपयांपासून सुरू झालेला हा खेळ १००, २००, ५०० ते हजार रुपयांपर्यंत पोहोचतो. ज्या दिवशी आकडा फसला तो दिवस ‘सोन्याचा’ वाटतो, पण त्या नादात रोज पदरी फक्त नुकसान पडते. कधीतरी होणाऱ्या फायद्याच्या आशेने कष्टाने कमावलेला पैसा या ‘झटपट’ पैशाच्या हव्यासापोटी पाण्यात जात आहे. दारू, खर्रा या व्यसनांनंतर आता मटक्यासारखं आर्थिकदृष्ट्या कंगाल करणारं व्यसन महिलांमध्ये फोफावत चाललं आहे.

स्त्री संसार सांभाळते, उद्ध्वस्त करत नाही…

अशी आपली सामाजिक धारणा आहे. पण जेव्हा गरिबी, अज्ञान आणि झटपट श्रीमंत होण्याची हाव एकत्र येते, तेव्हा स्थानिक परिस्थिती बदलताना दिसत आहे. आज वणीत पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मटका बहाद्दर बनू लागल्या आहेत, ही धोक्याची घंटा आहे.

पोलिसांसमोर नवीन आव्हान: आता महिला स्क्वॉडची गरज?

अवैध मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पोलीस नेहमीच धाडी टाकतात. लोकांवर कारवाई केली जाते, रक्कम आणि चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात येतात. मात्र, आता महिलांचा या व्यवसायातील आणि खेळण्यातील थेट सहभाग पाहता, पोलिसांना धाडी टाकताना विशेष ‘महिला स्क्वॉड’ (Woman Squad) सोबत ठेवावे लागणार आहे, असे चित्र समोर येत आहे. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे हे बदलते रूप कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नवीन आव्हान ठरत आहे.

या बाबीकडे समाजाने आणि प्रशासनाने अतिशय गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे.

 1. **बचत गटांचे समुपदेशन:** महिला बचत गटांच्या माध्यमातून अशा जुगारी प्रवृत्तीविरुद्ध स्थानिक पातळीवर जागृती करणे गरजेचे आहे.

 2. **अवैध अड्ड्यांवर कडक कारवाई:** शहरात महिलांपर्यंत मटक्याच्या चिठ्ठ्या पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत, शोधून त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

 3. **कष्टाच्या पैशाचे मूल्य:** झटपट मिळणारा पैसा हा कधीच टिकत नाही आणि जुगारातून कोणीही सुखी झालेलं नाही, हा धडा या कुटुंबांना पटवून द्यावा लागेल.

वेळेतच जर या ‘आकड्यांच्या बाजीगरी’ला लगाम घातला नाही, तर मजुरी करून चालणारे वणीतील अनेक गरिबांचे संसार रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए