HomeAgroयवतमाळ गुन्हे शाखेची जोरदार कारवाई, वणी आणि पांढरकवडा विभागातील शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी...

यवतमाळ गुन्हे शाखेची जोरदार कारवाई, वणी आणि पांढरकवडा विभागातील शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद! १४.७३ लाखांच्या मुद्देमालासह ३ आरोपींना अटक!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी आणि पांढरकवडा उपविभागातील ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या कृषी साहित्याची चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यवतमाळ आणि वणी पोलिसांच्या संयुक्त पथकाला मोठे यश आले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ३ मुख्य संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १० गुन्हे उघडकीस आणले असून, तब्बल १४ लाख ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोरीची पार्श्वभूमी व घटनाक्रम…

गेल्या काही दिवसांपासून वणी व पांढरकवडा उपविभागातील वणी, मारेगाव, पांढरकवडा, मुकुटबन, पारवा, पाटण आणि राळेगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेत शिवारांमधून तसेच इतर ठिकाणांवरून महावितरणच्या इलेक्ट्रिक खांबांवरील ॲल्युमिनियम तार, शेतकऱ्यांचे शेतातील पाण्याचे मोटर पंप आणि केबल वायर चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. चोरांच्या या टोळीने ग्रामीण भागात अक्षरशः थैमान घातले होते, ज्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त होता.

या वाढत्या चोऱ्यांची गंभीर दखल घेत यवतमाळचे पोलीस अधीक्षक मा. कुमार चिंता आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. अशोक थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या टोळीचा छडा लावण्याचे कडक आदेश दिले होते.

अशी झाली अटक आणि कारवाई…

मिळालेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा वणी/पांढरकवडा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर व त्यांचे पथक १३ जुलै २०२६ रोजी वणी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, वणी पोलीस स्टेशन अभिलेखावरील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे वणी येथील रंगनाथ नगरजवळील खुल्या मैदानात एकत्र जमले आहेत.

पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रंगनाथ नगरमधील खुल्या मैदानातून संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच मुख्य आरोपी शेख समीर याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी एका मालवाहू वाहनाचा (क्रमांक MH/34/BZ/6522) वापर करून पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मारेगाव, मुकुटबन आणि पारवा पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या कटरच्या साहाय्याने खांबांवरील ॲल्युमिनियम तार व शेतातील मोटर पंप चोरल्याचे कबूल केले. तसेच हा चोरलेला सर्व माल त्यांनी शास्त्री नगर, वणी येथील भंगार व्यावसायिक निसार खान याला विकल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे घोन्सा टी-पॉईंटजवळ सापळा रचून भंगार दुकानदार निसार खान याला त्याच्या मालवाहू गाडीसह (क्रमांक MH/29/BE/8442) ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता त्यात १११० किलो चोरीचा ॲल्युमिनियम तार जप्त करण्यात आला. तसेच मुख्य आरोपी शेख समीर याच्या घराच्या मोकळ्या जागेतून चोरलेली केबल जाळून काढलेली तांब्याची तार आणि सबमर्सीबल मोटार जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१) शेख समीर ऊर्फ समीर शेख अमीर (वय २६ वर्ष, रा. रंगनाथ नगर, वणी)

२) सैय्यद अली ऊर्फ सैय्यद गुलाब (वय ३५ वर्ष, रा. रंगनाथ नगर, वणी)

३) निसार खान ऊर्फ निसारोद्दीन खान जलालोद्दीन खान (वय ५२ वर्ष, रा. शास्त्री नगर, वणी – भंगार दुकानदार)

(या गुन्ह्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक व वाहनाचा ड्रायव्हर दीपक यांचाही समावेश आहे).

जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल (एकूण किंमत: १४,७३,०००/- रुपये):

ॲल्युमिनियम तार: वजन अंदाजे १११० किलो — किंमत रु. ३,३०,०००/-

तांब्याची तार (केबल जाळून काढलेली): वजन १४ किलो — किंमत रु. २४,०००/-

सबमर्सीबल पाण्याची मोटार: ०१ नग — किंमत रु. १४,०००/-

चोरीचा माल नेणारे मालवाहू वाहन (क्र. MH/29/BE/8442): किंमत रु. ५,००,०००/-

चोरीत वापरलेले मालवाहू वाहन (क्र. MH/34/BZ/6522): किंमत रु. ६,००,०००/-

तार कापण्याचे कटर (चिमटा): ०१ नग — किंमत रु. ५,०००/-

कारवाईत सहभागी असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार:

ही यशस्वी कामगिरी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक मा. अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणारे प्रत्यक्ष पथक:

दत्ता पेंडकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वणी/पांढरकवडा पथक)

धनराज ढाके (पोलीस उपनिरीक्षक)

सुनील खंडागळे (पोलीस हवालदार)

सुधीर पांडे (पोलीस हवालदार)

सुधीर पिदुरकर (पोलीस हवालदार)

रजनीकांत मडावी (पोलीस शिपाई)

सलमान शेख (चालक पोलीस शिपाई)

सतीश फुके (पोलीस हवालदार)

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए