Homeक्राइमचाकूचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा; पोलिसांनी धारदार शस्त्र जप्त करून केली...

चाकूचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा; पोलिसांनी धारदार शस्त्र जप्त करून केली कारवाई!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

चाकूचा धाक दाखवत एका व्यक्तीला धमकावल्याच्या तक्रारीनंतर वणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका तरुणाकडून धारदार लोखंडी चाकू जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास गोकुळ नगर येथील रहिवासी ख्वाब अली खान यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत सोहेल मोहम्मद गनी (वय २०), रा. रंगनाथ नगर, वणी हा त्यांच्या घरी येऊन हातातील चाकू दाखवत धमकावत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

तक्रार प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक शुभम मारोती महानवर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीदरम्यान परिसरातील एका महिलेनेही आरोपी चाकू घेऊन आल्याची माहिती पोलिसांना दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची तपासणी केली असता घरासमोरील कुंड्यांमध्ये लपवून ठेवलेला धारदार लोखंडी चाकू आढळून आला. घटनास्थळी उपस्थित महिलेनेही जप्त करण्यात आलेला चाकू हाच आरोपीकडे असल्याची ओळख पटवून दिली.

जप्त करण्यात आलेल्या चाकूची एकूण लांबी २९ सेंटीमीटर, तर त्यावरील धारदार ब्लेडची लांबी १८.०७ सेंटीमीटर असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या शस्त्राद्वारे गंभीर स्वरूपाची दुखापत किंवा जीवघेणा हल्ला होऊ शकतो, असे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच संबंधित शस्त्र बाळगण्यासाठी आवश्यक परवाना मागितला असता आरोपी कोणताही वैध परवाना सादर करू शकला नाही.

पंचांसमक्ष चाकू जप्त करून सोहेल मोहम्मद गनी याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, वणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए