Homeमहाराष्ट्रवणीत काँग्रेस आक्रमक: दिल्लीतील लाठीहल्ला व राहुल गांधी यांच्या अपमानाचा निषेध; उपविभागीय...

वणीत काँग्रेस आक्रमक: दिल्लीतील लाठीहल्ला व राहुल गांधी यांच्या अपमानाचा निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी करण्यात आलेले अनुचित वर्तन या घटनांचे तीव्र पडसाद वणीत उमटले आहेत. या दोन्ही घटनांच्या विरोधात वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक शिवाजी चौक येथे एकदिवसीय धडक धरणे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.

निवेदनाद्वारे प्रमुख मागण्या:

सखोल चौकशी: जंतर-मंतर येथील लाठीमार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी.

घटनात्मक अधिकार: नागरिकांच्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याच्या लोकशाही अधिकारांचे रक्षण व्हावे.

विरोधी पक्षनेत्यांचा सन्मान: मा. राहुल गांधी यांच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई केली जावी.

विद्यार्थ्यांच्या मागण्या: NEET परीक्षा पेपरफुटीविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या तातडीने मंजूर कराव्यात.

‘लोकशाही मूल्यांची पायमल्ली’ — विकेश पानघाटे

आंदोलनादरम्यान बोलताना वणी तालुका काँग्रेस अध्यक्ष विकेश पानघाटे म्हणाले, “शांततापूर्ण मार्गाने न्याय मागणे हा लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिलेला घटनात्मक अधिकार आहे. आंदोलकांवर बळाचा वापर करणे आणि संसदीय परंपरांचा अवमान करत विरोधी पक्षनेत्यांशी गैरवर्तन करणे ही थेट लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.”

लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती..

शिवाजी चौकातील या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, शहर अध्यक्ष जय आबड, देविदास काळे, प्रमोद वासेकर, डॉ. कावडे, मोरेश्वर पावडे, रुपेश ठाकरे, टिकाराम कोंगरे, वंदना आवारी, रवींद्र होकम, अफसर शेख, सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, फरीद शेख, राजू अंकतवार, सुरज पुल्लेवार, तेजराज बोढे, राजू काळे, भास्कर वासेकर, अनंत डुंबारे, पांडुरंग पंडिले, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, रवींद्र कांबळे, श्यामा तोटावार, मनीष खाडे, अशोक चिकटे, पलाश बोढे, रोहित मालेकर, वंदना धगडी, सविता रासेकर, प्रेम मेश्राम, प्रेम मंगाम, अनिल भोयर, विजय मालेकर, अशोक नागभीडकर, भास्कर आत्राम, नंदकिशोर अंबोरे, पुंडलिक गुंजेकर, सुरेखा वडीचार, अल्का मोवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा…

शासन व प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने नोंद न घेतल्यास आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने याहून अधिक तीव्र संघर्ष करेल, असा इशाराही यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए