सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
भारतीय जनता पार्टीचे वणी शहर कोषाध्यक्ष तथा यशस्वी उद्योजक मयूर गोयनका यांचा आज वाढदिवस असून, त्यानिमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अत्यंत तरुण वयात पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मयूर गोयनका हे पक्षाचे एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

पक्षाची ध्येयधोरणे आणि वरिष्ठांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय निष्ठेने व तन-मन-धनाने पार पाडण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. भाजप शहर अध्यक्ष निलेश चौधरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गोयनका यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर अल्पावधीतच पक्षसंघटनेत आणि नागरिकांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येत असतानाच, पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या जबाबदारीला उत्तम न्याय दिला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या काळात प्रभाग क्रमांक १० मधील आरोग्य सभापती अनिल चिंडालिया व आरती पांढरे यांच्या विजयामध्ये मयूर गोयनका यांनी पडद्यामागून बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची ठरली होती. पक्षाने सोपवलेले कोणतेही काम वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याची त्यांची हातोटी ही त्यांची मुख्य ओळख बनली आहे.
त्यांच्या या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मयूर गोयनका यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे आणि आरोग्यादायी जावो, तसेच पक्षाच्या माध्यमातून त्यांना जनसेवेच्या आणि संघटनेच्या विविध मोठ्या जबाबदाऱ्या मिळोत, अशा सदिच्छा त्यांच्या समर्थकांनी व पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

























