सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
वणी येथील प्रसिद्ध ‘गोयल कटपीस आणि साडी सेंटर’चे संचालक दयाराम चिरंजीवलाल गोयल(वय ८२) यांचे आज, सोमवार दिनांक २७ जुलै २०२६ रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. ते काही काळापासून आजारी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते,दोन दिवसांपूर्वीच त्यांना वणीला परत आणले होते व रविनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला…

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून दयारामजी यांनी आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी घरातूनच साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या बळावर त्यांनी ‘गोयल कटपीस आणि साडी सेंटर’ची पायाभरणी केली.
आपल्या मेहनतीने त्यांनी या दुकानाला एका मोठ्या ब्रँडचे स्वरूप दिले. आज वणी शहरात त्यांच्या अनेक शाखा कार्यरत असून वणीसह यवतमाळ, चंद्रपूर व परिसरातील नागरिकांची कपडा व लग्नसराई खरेदीसाठी ‘गोयल कटपीस’ हीच पहिली पसंती बनली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वणीतील व्यापारी व सामाजिक वर्तुळात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
उद्या सकाळी निघणार अंतिम यात्रा:
दयारामजी गोयल यांची अंतिम यात्रा उद्या, मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या निवासस्थानातून, रवी नगर, वणी येथून मोक्षधामसाठी (स्मशानभूमी) रवाना होईल.
त्यांच्या निधनाने वणीतील उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली असून, ‘सिटी हब मीडिया’ तर्फे दयारामजी गोयल यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

























