सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहर भाजपच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गृहभेटी देऊन गौरव करण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपत व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वणी शहर मंडलाच्या वतीने एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी, २९ जुलै रोजी शहरातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्वांच्या निवासस्थानी जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला.
या उपक्रमांतर्गत खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले:
* **आध्यात्मिक क्षेत्र:** विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड
* **धार्मिक क्षेत्र:** ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत
* **शैक्षणिक क्षेत्र:** गजानन कासावार सर
* **सामाजिक क्षेत्र:** निवृत्त शिक्षक बोधे सर
* **आरोग्य क्षेत्र:** डॉ. सपाट सर
* **क्रीडा क्षेत्र:** राजू डवरे सर

समाजात ज्ञान, आरोग्य, अध्यात्म आणि क्रीडा संस्कृती रुजविणाऱ्या या मार्गदर्शकांचा गौरव करताना भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सौ. विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दीपक पाऊणकर, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, मंडल सरचिटणीस तथा नगरसेवक लक्ष्मण उरकुडे, नगरसेवक अनिल चिंडालिया, कार्यक्रम समन्वयक तथा मंडल सरचिटणीस हितेन अटारा, मंडल उपाध्यक्ष मनोज सरमुकदम, रोहित वनकर सर, राजेंद्र साखरकर सर, गणेश आसूटकर सर, सौ. भारती बदखल, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. नीता पिदुरकर, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी भेदोडकर व श्रेयस हरणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजाची उभारणी करणाऱ्या आणि तरुण पिढीला दिशा दाखवणाऱ्या गुरुजनांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे वणी शहरातील नागरिकांनी व मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


























