सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वणी नगर शाखेच्या सत्र २०२६-२७ च्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. विद्यार्थी हित जपणे, संघटन मजबूत करणे आणि विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना वाव देणे या उद्देशाने या नव्या टीमची निवड झाली आहे. निर्वाचन अधिकारी प्रा. वैभव देहेकर यांनी या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली.

या नव्या कार्यकारिणीत शहर अध्यक्ष म्हणून प्रा. चैतन्य तुरविले आणि नगरमंत्री म्हणून अंकित भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नगर सहमंत्री पदाची जबाबदारी वेदांत भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
इतर प्रमुख उपक्रमांचे प्रमुख व संयोजक:
राष्ट्रीय कलामंच संयोजक: योगिनी खारकर
तंत्रशिक्षण प्रमुख: प्रतीक बोंडे
विकासार्थ विद्यार्थी विभाग प्रमुख: नमन रावणहत्ते
SFS प्रमुख: प्रणव ओझा
खेलो भारत संयोजक: पियुष वाढई (सहसंयोजक: यश गायकवाड)
मीडिया संयोजक: विवेक झाडे
सोशल मीडिया संयोजक: आयुष अक्कलवार
कार्यालय मंत्री: विधान फुल्लेवार
नगर छात्रा प्रमुख: अश्विनी डाहुले
कार्यकारिणी सदस्य:
केशर रायपुरे, तनवी धानोरकर, गौरी बर्डे, करण मेडपटलवार, विनय पुरणकर आणि समीर राऊत यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
या घोषणा कार्यक्रमाला निर्वाचन अधिकारी प्रा. वैभव देहेकर, प्रा. चैतन्य तुरविले, वणी जिल्हा संयोजिका आयुष्य फुलेवार, दक्ष राजुरकर, नयन क्षीरसागर आणि वणी जिल्हा विद्यार्थी विस्तारक जय टोंगे यांच्यासह अभाविपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले असून आगामी काळात शैक्षणिक प्रश्न, सांस्कृतिक, क्रीडा व संघटनात्मक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

























