Homeक्राइमवणी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीचा ट्रक परत मिळवला,आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; चार...

वणी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीचा ट्रक परत मिळवला,आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; चार जण गजाआड!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; लातूरमधून ट्रक जप्त…

 

वणी शहरातील लालपुलिया परिसरातून चोरीला गेलेल्या तब्बल २५ लाख रुपये किमतीच्या टाटा हायवा ट्रकचा शोध घेण्यात वणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत वाहनचोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील चार संशयितांना अटक करण्यात आली असून, चोरीचा ट्रक लातूर जिल्ह्यातून जप्त करण्यात आला आहे.

१ जून २०२६ रोजी विशाल लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा सीजी-०४ एनव्ही-१४८१ क्रमांकाचा बारा चाकी हायवा ट्रक लालपुलिया परिसरातून चोरीला गेला होता. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर हर्षल लोहबळे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची बारकाईने पडताळणी केली. तपासादरम्यान या गुन्ह्याचे धागेदोरे चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांपर्यंत पोहोचले. त्याआधारे पोलिसांनी अजय केसकर, राजू उर्फ जयप्रकाश केसकर, हिरालाल कश्यप आणि रविशंकर प्रसाद या चौघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीचा ट्रक लातूर परिसरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकून सुमारे २५ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक हस्तगत केला.

या टोळीचा इतर वाहनचोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात पार पडली. डी.बी. पथकातील पोउपनि साजिद सय्यद तसेच गजानन सावसाकडे, मोरेश्वर खंडारे, नंदकुमार पुप्पलवार, गणेश मेश्राम, नितेश भोयर आणि रितेश भोयर यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए