सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांवर नगरसेवक सैफुर मोबीन रहमान आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर…

वणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या विविध समस्या व विकासात्मक कामांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक सैफुर मोबीन रहमान यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे विविध मागण्या सादर केल्या आहेत. १० ऑगस्ट २०२६ रोजी नगर परिषद प्रशासनाकडे ही निवेदने सोपवण्यात आली आहेत.
नगरसेवक सैफुर मोबीन रहमान यांनी प्रभागातील आरोग्य, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधताना खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
* उघड्या नाल्यांचे भूमिगत बांधकाम:
* शास्त्रीनगर मैल गड्यामध्ये शमशाद शेख ते इसहाक शेख यांच्या घरापर्यंत…
* शास्त्रीनगर मैल गड्यामध्ये रशीद शेख ते रेहाना शेख यांच्या भागातील उघड्या नालीचे भूमिगत बांधकाम.
* शास्त्रीनगर मैल गड्डा परिसरात सौ. शारदा सोळंकी यांच्या घराजवळील उघड्या नालीचे (सुमारे ५० ते ६० मीटर) भूमिगत बांधकाम.
उघड्या नाल्यांमुळे परिसरात डास, किडे, किटक आणि सापांचा प्रादुर्भाव वाढला असून रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी तक्रारी देऊनही कारवाई न झाल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
* रस्त्यावर गट्टू बसवणे:
शास्त्रीनगर कोंडनावाडी येथील सुनिल पचारे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या बाजूला आणि सुनिल पचारे यांच्या घरासमोरील मंदिरासमोरील रस्त्यावर गट्टू (पेव्हिंग ब्लॉक्स) बसवण्यात यावेत.
* प्रभागात फॉगिंग फवारणी:
संपूर्ण प्रभाग क्र. १३ (शास्त्रीनगर, रंगनाथ नगर, मैलगड्डा, कोंडनावाडी) मध्ये डास व किटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी संपूर्ण प्रभागात तात्काळ फॉगिंग फवारणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
* शाळांमध्ये जनजागृती भिंतीचित्रे (पेंटिंग):
न.प. शाळा क्र. ०४ व न.प. शाळा क्र. ०२ मध्ये मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी व जनजागृती व्हावी यासाठी शाळेच्या भिंतींवर बोधप्रद व शैक्षणिक चित्रे काढण्यात यावीत.
प्रभागातील नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने या सर्व मागण्यांची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक सैफुर मोबीन रहमान यांनी केली आहे.

























