सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी..
छोरिया टाऊनशिप वणी येथील रहिवासी व अन्नधान्याचे ठोक व्यापारी चंद्रकांतभाई केशवलालभाई जोबनपुत्रा यांच्या धर्मपत्नी तथा श्री. यशभाई व श्री. अंकितभाई जोबनपुत्रा यांच्या मातोश्री स्व. सौ. पूनमबेन चंद्रकांतभाई जोबनपुत्रा (वय ६४ वर्षे )यांचे आज मंगळवारी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले.मागील काही काळापासून त्या आजारी होत्या…

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जोबनपुत्रा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर दिवंगत पुण्यात्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
त्यांची वैकुंठ यात्रा आज मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता त्यांच्या ‘छोरिया टाऊन’ येथील निवासस्थानावरून निघणार आहे.

























