Homeविदर्भचंद्रपुरप्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या जयंतीनिमित्त वणीत २६ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान...

प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या जयंतीनिमित्त वणीत २६ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर ,जमात-ए-इस्लामी हिंद (युवा शाखा) वणीचा सलग १२ व्या वर्षी अखंड सामाजिक वसा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

“एका माणसाचे प्राण वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवता वाचवणे!”

“रक्तदानाला जात, धर्म, भाषा किंवा पंथाची सीमा नसते; रक्ताचा रंग एकच – माणुसकीची भावना एकच!” हा उदात्त विचार कृतीत आणत जमात-ए-इस्लामी हिंद (युवा शाखा), वणी यांच्या वतीने प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मानवतेच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम यंदा आपल्या यशस्वी १२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर व लाईफ लाईन नागपूरचे सहकार्य…

हे रक्तदान शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC)चंद्रपूर आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे.

वर्षाचे ३६५ दिवस अखंड रुग्णसेवा…

जमात-ए-इस्लामी हिंदची युवा शाखा केवळ वर्षातून एक दिवस शिबिर घेऊन थांबत नाही, तर वर्षभर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत गरजू, गरीब आणि गंभीर रुग्णांसाठी तातडीने रक्ताची सोय करण्यासाठी २४ तास तत्पर असते. वणी व परिसरातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी संस्था निरंतर कार्यरत आहे.

कोविड संकटातही निभावले होते सामाजिक कर्तव्य…

वर्ष २०२० मधील भीषण कोविड-१९ महामारीच्या काळात, जेव्हा सर्वसामान्य नागरिक घरातून बाहेर पडण्यास घाबरत होते आणि रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत वणी परिसरातील ४ पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले होते. या संकटकालीन सेवेचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक झाले होते.

कुरआण शरीफचा मानवतेचा संदेश आणि सर्वधर्मसमभाव…

“एका माणसाचे प्राण वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवता वाचवणे” (कुरआण शरीफ ५:३२) या पवित्र शिकवणीतून प्रेरणा घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात समाजातील सर्व धर्म, पंथ आणि घटकांमधील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे कळकळीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

📍 शिबिराचा संपूर्ण तपशील:

वार व दिनांक: बुधवार, २६ ऑगस्ट २०२६

वेळ: सकाळी ९.०० वाजतापासून

उद्घाटन कार्यक्रम / प्रमुख उपस्थिती…

एस.डी.पी.ओ. (उपविभागीय पोलीस अधिकारी) महाल्ले सर

पोलीस निरीक्षक (PI) भानुदास पिदूरकर

पोलीस निरीक्षक (PI) नरेश रणबिर

डॉ. सुलभेवार सर (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वणी)

डॉ. समीर थेरे सर (तालुका आरोग्य अधिकारी – THO)

स्थळ: टिळक चौक, वनविभाग कार्यालयाच्या बाजूला, वणी

आयोजक: जमात-ए-इस्लामी हिंद (युवा शाखा), वणी…

सहकार्य: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर व लाईफ लाईन ब्लड सेंटर, नागपूर

चला… रक्तदान करूया! ❤️ जीवन वाचवूया! ❤️ माणुसकी जपूया! ❤️ सामाजिक एकतेचा संदेश देऊया!

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए