सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
केंद्र व राज्य सरकारच्या सर्वसामान्यांविरोधी धोरणांना आव्हान देण्यासाठी आणि कष्टकरी जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (भाकप) राजधानी दिल्लीत भव्य महासभेचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आयोजित ‘बदलाव जरूरी है’ या राष्ट्रीय महारॅलीत सहभागी होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचे पथक आज वणी येथून दिल्लीकडे कूच झाले.

प्रमुख मागण्या:
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा ₹२६,००० किमान वेतन लागू करणे.
संबंधित कर्मचाऱ्यांना ₹९,००० निश्चित मानधन/पेन्शन देऊन त्यावर महागाई भत्ता देणे.
वाढत्या महागाईवर नियंत्रण आणून तरुणांसाठी रोजगाराच्या ठोस संधी उपलब्ध करणे.
शेतमालाला रास्त भाव, कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि शिक्षण-आरोग्याचे व्यापारीकरण थांबवणे.
देशातील लोकशाही, सामाजिक न्याय व संवैधानिक मूल्यांचे संरक्षण करणे.
नेत्यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी:
भाकप जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे, वणी तालुका सचिव कॉ. मोरेश्वर कुंटलवार, बाभुळगाव तालुका प्रभारी कॉ. दीपक माहुरे, नेर तालुका सचिव कॉ. दिलीप महाजन तसेच किसान सभेचे अध्यक्ष कॉ. पंढरी मोहितकर आणि सचिव कॉ. रवी गोरे यांच्या नेतृत्वात हा जथ्था वाहनांच्या ताफ्यासह दिल्लीकडे निघाला. केंद्र आणि राज्य व्यवस्थेत आता बदलाची गरज असल्याचा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र संघर्षाचा इशारा दिला…


























