HomeAgroलहानग्यांच्या आनंदाला उधाण: शिवसेना वणी व विजय चोरडियांतर्फे भव्य तान्हा पोळा महोत्सव,...

लहानग्यांच्या आनंदाला उधाण: शिवसेना वणी व विजय चोरडियांतर्फे भव्य तान्हा पोळा महोत्सव, प्रत्येक स्पर्धकाला भेट!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या भव्य व यशस्वी आयोजनानंतर,वणीत रंगणार भव्य तान्हा पोळा महोत्सव: ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वात बालगोपालांसाठी बक्षिसांची लयलूट! 

शिवसेना वणी आणि शिवसेना यवतमाळ जिल्हा संघटक श्री. विजय चोरडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात भव्य ‘तान्हा पोळा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून विजय चोरडिया यांचे सुपुत्र ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होत असलेला हा महोत्सव बालगोपाळांसह त्यांच्या पालकांच्या मनातील एक मोठे आकर्षण ठरत आहे. अत्यंत नेटकेपणाने आणि काटेकोर नियोजनात पार पडणारा हा सोहळा शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, शासकीय पाण्याच्या टाकीजवळ, वणी येथे रंगणार आहे.

बालगोपालांचा उत्साह आणि कल्पक देखावे…

या महोत्सवाचे आकर्षण इतके वाढले आहे की, वणीसह परिसरातील अनेक बालगोपाल दुरून दुरून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येतात. लहान मुले आपापल्या लाकडी नंदीबैलांना घेऊन दाखल होतात, त्यांची विविध प्रकारची आकर्षक सजावट करतात आणि नाविन्यपूर्ण थीमवर आधारित सुंदर देखावे साकारतात. यामुळे संपूर्ण परिसराला एका मोठ्या जत्रेचे आणि उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते.

२० सायकलींसह बक्षिसांची मोठी रेलचेल…

लहानग्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आयोजकांतर्फे भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे:

 * गट A (वय ० ते ४ वर्षे): १ इलेक्ट्रिक त्रिचक्री, ३ त्रिचक्री (Tricycle), १ स्कूटर

 * गट B (वय ४ ते ६ वर्षे): ४ स्कूटर

 * गट C (वय ६ ते ८ वर्षे): ४ स्कूटर

 * गट D (वय ९ ते १२ वर्षे): ४ स्कूटर

“कुणीही विना हाताने परतणार नाही”: प्रत्येकाला प्रोत्साहनपर भेट…

या महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा अत्यंत कुशलतेने आणि पारदर्शक पद्धतीने संपन्न केली जाते. ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वात त्यांची मित्रमंडळी आणि संपूर्ण टीम यासाठी अहोरात्र कार्यरत असते. स्पर्धेत कुणालाही विना हाताने किंवा नाराज होऊन परतावे लागू नये, प्रत्येकाच्या हातात काही ना काही बक्षीस अथवा भेट मिळालीच पाहिजे, याची ही टीम विशेष काळजी घेते. येणाऱ्या प्रत्येक बालगोपालाच्या हाती भेटवस्तू दिली जात असल्याने मुलांच्या मनात अथांग आनंद, उत्साह राहतो आणि प्रत्येक जण इथून आनंदी व समाधानी चेहऱ्याने घरी परततो.

प्रवेश विनामूल्य; मर्यादित नोंदणी…

या भव्य स्पर्धेत प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्यात आला असून एकूण ३०० नोंदणींची प्रवेश मर्यादा आहे. स्पर्धेची नोंदणी थेट कार्यक्रम स्थळावरच घेतली जाणार आहे.

समस्त शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या आणि बाल गोपालांना तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देत, पालकांनी आपल्या चिमुकल्यांसह या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्री. विजय चोरडिया, ॲड. कुणाल चोरडिया व शिवसेना वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

शुभम गोरे – ७९७२२८४२३८

सागर मुने – ९०२८९०३५११

राजु रिंगोले – ९२८४८८१६५५

सौरभ राजूरकर – ९५५७६९८३३२

आयोजक: शिवसेना वणी ,श्री. विजय चोरडीया, शिवसेना जिल्हा संघटक, यवतमाळ.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए