सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ ऊर्फ वासुदेव सदाशिवराव देशपांडे (मार्डीकर) यांचे आज, रविवारी दुपारी १.३० वाजता प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
स्व. राजाभाऊंचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी रेशीमबाग येथील संघ कार्यालयात आज सायंकाळी ५ वाजल्यापासून उद्या, सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता रेशीमबाग संघ कार्यालयातून त्यांची अंतिम यात्रा निघेल आणि गंगाबाई घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
संघ परिवारातील निष्ठावंत व समर्पित व्यक्तिमत्त्व गमावल्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती.

























