सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
जनतेच्या प्रश्नांवर बच्चूभाऊ कडू पुन्हा मैदानात! यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात धडकणार झंझावाती दौरा!
“जनतेच्या समस्या, आमचा लढा… विकास आमचा ध्यास!” या ब्रीदवाक्यासह मा. श्री. बच्चूभाऊ कडू यांचा २ दिवसीय धडाकेबाज दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ८ आणि ९ ऑक्टोबर २०२६ रोजी बच्चूभाऊ कडू यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील विविध भागांत भेट देऊन शेतकरी, कामगार आणि स्थानिकांच्या प्रश्नांना थेट हात घालणार आहेत.
दौऱ्याचे प्रमुख मुद्दे व अजेंडा:
हा दौरा विशेषतः शेतकरी, कामगार आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खालील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा आणि आंदोलनाची दिशा ठरवली जाईल:
* पुनर्वसन व शेतीचा योग्य मोबदला
* कोळसा साठा गैरव्यवहार व वाढते प्रदूषण
* जड वाहतूक आणि अपघातांची समस्या
* स्थानिक कामगारांच्या समस्या व रोजगाराचा प्रश्न
दौऱ्याचे संपूर्ण पत्रक (वेळापत्रक):
दिवस १: गुरुवारी, ०८/१०/२०२६ (यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा)
* सकाळी ११:०० वा. – वणी: WCL (बोरगाव, जुनाड, भालर)
* दुपारी १२:०० वा. – नीलजई: जी.आर.एन. कंपनी (राजेंद्र दवस उपोषण स्थल)
* दुपारी ०१:०० वा. – घुग्घुस: कारगिल चौक (कोळसा साठा, ४० लाखांची गाडी घटना)
* दुपारी ०२:०० वा. – साखरा: मुंगोली, कोलगाव, पैनगंगा खाणी (प्रदूषण, जड वाहतूक, बेरोजगारी)
* दुपारी ०३:०० वा. – गाडेगाव (ता. कोरपना): नवीन खदान, शेती मोबदला, पुनर्वसन
* दुपारी ०४:३० वा. – साखरी (ता. राजुरा): प्रदूषण, जड वाहतूक व अपघात समस्या
* संध्याकाळी ०६:०० वा. – बल्लारपूर: प्रदूषण, जड वाहतूक
* मुक्काम: चंद्रपूर
दिवस २: शुक्रवारी, ०९/१०/२०२६ (चंद्रपूर जिल्हा)
* सकाळी ११:०० वा. – चंद्रपूर: दुर्गापूर, पडमापूर, किटाळी, तिरवंजा (पुनर्वसन, शेतकरी व बेरोजगारी प्रश्न)
* दुपारी ०१:०० वा. – भद्रावती: पुनर्वसन, शेतकरी व प्रदूषण समस्या
* दुपारी ०३:०० वा. – माजरी (ता. वरोरा): माजरी, नागलोण, एकोणा (प्रकल्पग्रस्त, प्रदूषण व जड वाहतूक)
जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या बच्चूभाऊंच्या या झंझावाती दौऱ्यामुळे प्रशासनाची धांदल उडण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

























