Homeक्राइमवणीतील शासकीय आदिवासी वसतिगृहातून विद्यार्थिनी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल!

वणीतील शासकीय आदिवासी वसतिगृहातून विद्यार्थिनी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणारी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.झरी जामणी तालुक्यातील ही मुलगी वणी येथील जनता शाळेजवळील आदिवासी वसतिगृहात राहून बी.ए. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तिने आईला फोन केला होता. वसतिगृहातून सुट्टी घेतली असून, कॉलेजचे थोडे काम संपवून दसऱ्याला गावी येते, असे तिने सांगितले होते. मात्र, ती रात्रीपर्यंत घरी पोहोचली नाही. कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता.

कुटुंबीयांनी वसतिगृह, तिच्या मैत्रिणी आणि नातेवाइकांकडे शोध घेतला, परंतु तिचा काहीही पत्ता लागला नाही. कुणीतरी तिला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आईने व्यक्त केला आहे.

यावरून २२ ऑक्टोबर रोजी वणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध वणी पोलिस घेत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए