HomeAgroयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विजयानंतर आमदार संजय देरकरांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित संचालकांनी घेतले...

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विजयानंतर आमदार संजय देरकरांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित संचालकांनी घेतले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद; ‘मातोश्री’वर रंगली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खलबतं!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय खेचून आणला. या घवघवीत यशानंतर वणी मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने नवनिर्वाचित संचालक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दीपावली सणाच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत त्यांच्याकडून भावी वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले.या औपचारिक सदिच्छा भेटीदरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पक्षाचा वाढता प्रभाव आणि गावपातळीवरील संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांची तळमळ आणि निष्ठेमुळेच सहकारात हा विजय मिळवता आला, असे मत यावेळी मांडण्यात आले.

या बैठकीत केवळ विजयाचा आनंदोत्सव साजरा न करता जिल्ह्यातील बळीराजाच्या व्यथांवरही गांभीर्याने विचारमंथन झाले. विदर्भातील कोरडवाहू पट्ट्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती आणि अडचणीत सापडलेला शेतकरी वर्ग यासंदर्भात आमदार देरकर यांनी पक्षप्रमुखांना सविस्तर माहिती दिली. यावर बोलताना, संकटसमयी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरा आणि बळीराजाला संपूर्ण सहकार्य करा, असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिले.

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान ज्येष्ठ नेते व खासदार अरविंद सावंत, संपर्कप्रमुख अनिल आगळे, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित संचालिका किरण देरकर आणि संचालक सुनील कातकडे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, संजय निखाडे, प्रवीण शिंदे, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, अविनाश भुजबळराव, तसेच वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, मारेगाव तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, झरी तालुकाप्रमुख सतीश आदेवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. या विजयामुळे जिल्ह्यात पक्षाला नवी ऊर्जा मिळाली असून सहकाराच्या माध्यमातून जनसेवेचा वसा अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए