Homeमहाराष्ट्र*वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व खाजगी कंपन्यात 80% स्थानीक युवकांना कामावर घ्या --...

*वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व खाजगी कंपन्यात 80% स्थानीक युवकांना कामावर घ्या — आंदोलनकर्त्यांना धमकावण्याघा प्रयत्न झाल्यास भाकपचे लाल सैनिक यथोचित उत्तर देणार– लोकनेते काॅ.अनिल हेपट* *वणी*

-

[gtranslate]

Advertisementspot_img

*वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व खाजगी कंपन्यात 80% स्थानीक युवकांना कामावर घ्या — आंदोलनकर्त्यांना धमकावण्याघा प्रयत्न झाल्यास भाकपचे लाल सैनिक यथोचित उत्तर देणार– लोकनेते काॅ.अनिल हेपट…

वणी विधानसभा मतदारसंघात जेवढ्या खाजगी कोळसा व सिमेंट आणि इतर कंपण्या स्थापीत होत आहेत किंव्हा सुरु आहेत अशा सर्व कंपन्यामध्ये 80% स्थानिक भुमीपुत्रांना कामावर घ्या अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने लाऊन धरली आहे.त्याअनुषंगाने बेलोरा निलजई भागातील जिएनआर व साईडएक्स कंपनीमध्ये शेती गेलेल्या भुमीपुत्रांना नोकरीत सामाऊन घेण्याची मागणी भाकपने वारंवार केली आहे.कंपनिने स्थानिक युवकांना कामावर घेण्याचा शब्द भाकपला दिला.परंतु कंपनीने वारंवार दिलेला शब्द फिरविल्याने वणी विधानसभा मतदारसंघाचे एकमेव लढाऊ लाेकनेते काॅ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात भुमीपुत्रांनी ऐन दिवाळीत बेमुदत आंदोलन सुरु केले. कंपनीकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या सुद्धा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.प्रशासन मौन आहे.आंदोलकाना कसल्याही प्रकारचा धोका निर्माण झा ल्यास भाकपचे लाल सैनिक भाकप स्टाईलने उत्तर देण्यास सक्षम असल्याचा ईशारा काॅ.अनिल हेपट यांनी दिला आहे.

स्थानिक युवकांच्या रोजगार हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा गेल्या चार दिवसापासून संघर्ष सुरूच…

निलजई, ता. वणी, जि. यवतमाळ — वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वणी तालुका तर्फे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ठिया आंदोलन व १७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन आणि १८, १९ ऑक्टोंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले. कंपनी ज्या भूमीतून कोळसा काढते, त्या भूमीतील युवकांना रोजगार न देणे हा उघड अन्याय असून, भूमिहीन शेतमजूर व स्थानिक युवकांना दुर्लक्षित केल्यामुळे हा संघर्ष उभारण्यात आला.तसेही 80% स्थानिक युवकांना कंपनिने रोजगार द्यावा असा दि.18 नोव्हें.2008 चा शासनादेश आहे.

आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अनिल हेपट, कॉम्रेड अनिल घाटे, कॉम्रेड मोरेश्वर कुंटलवार, कॉम्रेड अथर्व निवडींग यांनी केले. “स्थानिकांना रोजगार द्या — बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. पोलिस प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कॉम्रेड अनिल हेपट यांनी ठाम शब्दांत सांगितले — “मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल करा; पण लढा थांबवणार नाही.”

दरम्यान, साईडएक्स कंपनीने आंदोलन दडपण्यासाठी गुंडांना पुढे करून आंदोलनकर्त्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “तुम्हाला पाहून घेईन” अशा भाषेत धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन मात्र मौन बाळगून बसले आहे. या कंपनीच्या गुंडा मुळे परिसरात शांतता व सुवेवस्थाचा प्रश्न निर्माण होत आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात महिला आणि लहान मुलांसह नागरिक चार दिवसांपासून रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना साईडएक्स कंपनी, माईन्स व पोलिस विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने संताप उसळला आहे.

आंदोलनकर्त्यांनी साईडएक्स कंपनीला WCL कडून दिलेले माती काढण्याचे ठेके बेकायदेशीर असल्याचा आरोप करून या कंपन्यांना परिसरातून हाकलून लावण्याची मागणी केली आहे. कोलमाईन्स प्रशासन आणि शासन यांच्या मिलीभगतीमुळेच हा अन्याय सुरू असल्याचे स्पष्ट करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चेतावणी दिली आहे की स्थानिकांना रोजगार मिळेपर्यंत आणि बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील अशी भाकपने घोषणा केली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए