Follow Us On

Tuesday, December 9, 2025
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रप्रभाग 11 भाजपचा बालेकिल्ला; लवली लाल–रेखाताई कोवे आणि विद्याताई आत्राम यांना प्रचंड...

    प्रभाग 11 भाजपचा बालेकिल्ला; लवली लाल–रेखाताई कोवे आणि विद्याताई आत्राम यांना प्रचंड जनसमर्थन!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक 11 : भाजपचा बालेकिल्ला मजबूत, लवली लाल – रेखाताई कोवे आणि विद्याताई आत्राम यांच्या बाजूने प्रचंड जनसमर्थन…

    प्रभाग क्रमांक 11 हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वर्षानुवर्षे या प्रभागातील नागरिकांनी कमळावर दाखवलेला विश्वास यंदाच्या निवडणुकीतही अधिक दृढ झालेला दिसतो. भाजपच्या उमेदवार लवली लाल आणि रेखाताई कोवे यांच्या प्रचार मोहिमेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद, त्यांच्या सभांतील उत्साह आणि घरोघरी होणाऱ्या जनसंपर्कामुळे या प्रभागातील राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने जोरदारपणे करते आहे.

    लवली लाल आणि रेखाताई कोवे यांच्या चोख प्रचारातून महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले जात आहे. प्रत्येक कॉर्नर सभेत उपस्थित नागरिकांची वाढती संख्या, उमेदवारांबद्दलचा विश्वास आणि उत्साह हे भाजपच्या विजयाचे स्पष्ट संकेत देत आहेत.

    भाजपच्या कारकिर्दीत झालेला मोठा विकास  शिवाजी महाराज उद्यानाचा उल्लेख आवश्यक…

    या प्रभागात भाजपच्या काळातच वणी शहरातील सर्वात मोठ्या बगीच्याची – छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची निर्मिती करण्यात आली. हा बगीचा आज प्रभागातील नागरिकांसोबतच संपूर्ण वणी शहरातील लोकांसाठी विरंगुळा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सर्वाधिक आवडते ठिकाण बनला आहे. या विकासकामामुळे नागरिकांमध्ये भाजपप्रती आणखी विश्वास निर्माण झाला असून, पक्षाच्या कामगिरीचा ठोस पुरावा म्हणून याकडे पाहिले जाते.

    पक्ष नेतृत्वाचा थेट पाठिंबा…

    या प्रभागातील प्रचार मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी स्वतः भेट देऊन उमेदवारांना मोठे समर्थन दिले. नागरिकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत, प्रभाग क्रमांक 11 मधून कमळाला विक्रमी मतांनी विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

    नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्या बाजूने अनुकूल समीकरणे…

    या प्रभागात केवळ नगरसेवक उमेदवारच पुढे नाहीत, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्यासाठीही अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. प्रभागातील सकारात्मक कल, लवली लाल–रेखाताई कोवे यांच्या दमदार जनसंपर्काची साथ, आणि भाजपची मजबूत संघटना यामुळे विद्याताई आत्राम यांना या प्रभागातून भरघोस लीड मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

    विरोधकांमध्ये वाढती अस्वस्थता

    लवली लाल व रेखाताई कोवे यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून विरोधकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लढत रंगतदार असली तरी भाजप अनेक पावले पुढे असल्याचे चित्र राजकीय पातळीवर स्पष्ट आहे. प्रभागातील जनता ठामपणे भाजपच्या बाजूने उभी असल्याने विरोधक नामोहरम झाल्याचे दिसत आहे.

    प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचा पारंपरिक प्रभाव, केलेली विकासकामे, उमेदवारांचा दमदार प्रचार आणि नेतृत्वाचा मजबूत पाठिंबा यामुळे कमळ या वेळीही मोठ्या मताधिक्याने फुलण्याची चिन्हे ठळकपणे दिसत आहेत. लवली लाल – रेखाताई कोवे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्या विजयाचा मार्ग अधिकाधिक सुकर होताना दिसत असून, हा प्रभाग भाजपच्या एकूण विजयात निर्णायक ठरणार आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    आशा वर्कर्सना थकीत मानधन मिळेपर्यंत आवाज उठवत राहणार विजय पिदुरकर यांची घोषणा...
    06:09
    Video thumbnail
    वणी आणि पंचक्रोशीतील लाखो लोकांचे श्रद्धास्थान गुंजेचा हनुमान...
    12:11
    Video thumbnail
    वणीच्या,निवडणूकीच्या,भ्रष्टाचाराच्या आरोपावर,विकासावर संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा अनकट इंटरव्ह्यू.
    48:18
    Video thumbnail
    वणी नगरपरिषद निवडणूक : भाजपचा आक्रमक घरोघरी प्रचार, ‘ट्रिपल इंजिन’च्या विकासाचा नारा!
    09:18
    Video thumbnail
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच वणीच्या सभेत भाषण...लाडक्या बहिणींना मतांसाठी आव्हान...
    24:01
    Video thumbnail
    वणीमध्ये संजय राठोड यांची आढावा बैठक; गांधी चौकातील गाळेधारकांना मिळणार दिलासा,चोरडिया यांची प्रशंसा
    03:03
    Video thumbnail
    माझ्या नाराजीच्या बातम्या पेरणे हे विरोधकांच्या हताशेचं चिन्ह,मी भाजपच्या विजयासाठी प्रतिबद्ध...
    04:41
    Video thumbnail
    न.प.साठी आमची तयारी पूर्ण,कार्यकर्ते उत्साही वणीला विकासाच्या मार्गावर - संजीवरेड्डी बोदकुरवार...
    10:19
    Video thumbnail
    विजय चोरडिया यांच्या संघटन कौशल्याच्या जोरावर शिवसेना (शिंदे)गट तगडा प्रतिद्वंदी म्हणून समोर...
    03:23
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे वणी कोरपना गडचांदूर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरूवात...
    04:42
    Video thumbnail
    कंपनीत मालक बनविण्याचे आमीष दाखवून हजारो महिलांना लाखोंचा गंडा...
    07:36
    Video thumbnail
    मतदार व उमेदवार यांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने केल्या आहेत खास सुविधा,नाव शोधणे अत्यंत सोपे...
    05:46
    Video thumbnail
    वणी कोरपना रस्ता दुरुस्त करा, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी या साठी विजय पिदुरकर आक्रमक...
    03:59
    Video thumbnail
    वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपची तयारी पूर्ण, तिकीटासाठी इच्छुकांची गर्दी...
    05:46
    Video thumbnail
    माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली विजय चोरडिया यांची संघटन मोहीम;फुल्ल इनकमिंग सुरू...
    02:04
    Video thumbnail
    रामपुरा तलावाच्या सौंदर्यीकरणाचं रखडलेलं काम पूर्ण करून वणीकरांसाठी नैसर्गिक स्थळ बनवणार-अंकुश बोढे
    03:45
    Video thumbnail
    वणी बसस्थानकावर नेहमी होतात विद्यार्थांचे हाल,बस वेळेवर येत नाही,विजय पिदुरकर यांनी साधला संवाद...
    04:26
    Video thumbnail
    निर्गुडा नदी स्वच्छ का नाही,पिण्याचे शुद्ध पाणी का नाही? मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा सवाल…
    02:18
    Video thumbnail
    चला गावाकडे गावाचा महोत्सव बघायला श्री जगदंबा माऊली उत्सव,गाव सावंगी(जुनी)...
    07:50
    Video thumbnail
    वैकुंठ महोत्सव २०२५श्री रंगनाथ स्वामी मंदिर वणी...#WaikunthMahotsav2025 #RanganathSwamiTemple
    01:16
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए