Homeमहाराष्ट्रअल्पशा मताने निवडणूक हरलो, पण जनतेचा नगरसेवक म्हणून लढा सुरूच – राजू...

अल्पशा मताने निवडणूक हरलो, पण जनतेचा नगरसेवक म्हणून लढा सुरूच – राजू रिंगोले!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

प्रभाग क्रमांक ८ : अल्पशा मतांनी पराभव; तरीही राजू रिंगोले जनतेच्या पाठीशी खंबीर…

प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार राजू रिंगोले यांना अल्पशा मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या पराभवानंतरही त्यांनी जनतेबाबतची आपली भूमिका अधिक ठाम शब्दांत स्पष्ट करत, जनतेच्या सेवेसाठी अखंड लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे.

राजू रिंगोले यांनी सांगितले की, निवडून आलेले विद्यमान नगरसेवक जर जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले,कमी ठरले तर ते स्वतः जनतेचा नगरसेवक म्हणून रस्त्यावर उतरून जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. जोपर्यंत जनतेच्या समस्या मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही,जनता मला माझ्या या 9284881655 मोबाईल नंबर वर कधीही संपर्क करू शकते आणि जोपर्यंत जनतेच्या समस्या दूर होणार नाही तोपर्यंत मी व माझे सहकारी गप्प बसणार नाही अश्या आशयाची भुमिका राजु रिंगोले यांनी स्पष्ट केली आहे…

“मी जरी निवडणूक हरलो असलो, तरी जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून मला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे ही माझी जबाबदारीच आहे,” असे राजू रिंगोले यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, नगरपालिका प्रशासनाकडे प्रभागातील विविध समस्या सातत्याने मांडल्या जातील. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सहकार्याची भूमिका राहील, मात्र प्रश्न सुटले नाहीत, तर संघर्षाचा मार्गही अवलंबला जाईल.

समाजकार्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले राजू रिंगोले हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्रिय आहेत. या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट)कडून निवडणूक लढवली. अल्पशा मतांनी पराभव झाला असला, तरी जनतेच्या सेवेत कोणतीही खंड पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“जनता केव्हाही माझ्या दारी येऊ शकते. त्यांच्या कोणत्याही समस्या असोत, त्या सोडवण्यासाठी मी आणि माझे समर्थक सदैव तत्पर आहोत. मी २४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आदी प्रश्नांसाठी नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मी पडलो असलो, तरी हरलो नाही. माझ्यासाठी राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. जनता माझ्यासोबत आहे आणि मी आणि माझे समर्थक व कार्यकर्ते जनतेसाठी कायम उभे राहणार,” अशी ठाम भूमिका राजू रिंगोले यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए