Homeमहाराष्ट्रवणी नगरपरिषद मध्ये अनुभव आणि जातीय समतोल साधत भाजपचा निर्णय; उपाध्यक्षपदाचा तिढा...

वणी नगरपरिषद मध्ये अनुभव आणि जातीय समतोल साधत भाजपचा निर्णय; उपाध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

नगरपालिकेत भाजपचा संतुलित निर्णय…

उपाध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर…

राकेश बुग्गेवार आधी, लक्ष्मण उरकुडे नंतर उपाध्यक्ष…

वणी नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह 18 नगरसेवक निवडून आणत नगरपालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय, सामाजिक आणि अनुभवाचा समतोल साधणारा महत्त्वाचा निर्णय घेत उपाध्यक्षपदाचा तिढा अखेर सोडवण्यात आला आहे.

आज 12 जानेवारी रोजी वणी नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, भाजपचे 18 नगरसेवक, विविध पक्षांतून निवडून आलेले नगरसेवक तसेच स्वीकृत सदस्य यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पदग्रहण सोहळ्यानंतर नगराध्यक्षांच्या कक्षामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्वतः माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी उपाध्यक्षपदाच्या निर्णयाची अधिकृत माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले की, भाजप नेतृत्वाने उपाध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या निर्णयानुसार, पहिल्या अडीच वर्षांसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी झालेले अनुभवी नगरसेवक राकेश बुग्गेवार यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यानंतर उर्वरित अडीच वर्षांसाठी प्रभाग क्रमांक 3 चे भाजप नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.

हा निर्णय महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप शहर अध्यक्ष निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीनुसार हा निर्णय झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवक गटामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

राकेश बुग्गेवार हे मागील टर्ममध्येही नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदाही त्यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून मताधिक्याने विजय संपादन केला असून, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ नगरपालिकेच्या सुरुवातीच्या काळात व्हावा, या उद्देशाने त्यांना प्रथम उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, लक्ष्मण उरकुडे हे कुणबी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. उरकुडे परिवाराचा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्वाशी अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध राहिला आहे. त्यांनी सातत्याने संघटनात्मक आणि सामाजिक कार्य करत भाजपशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली आहे.

लक्ष्मण उरकुडे यांचा प्रभाग क्रमांक 3 हा माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यक्षेत्रात येतो. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या प्रभागापुरता विचार न करता संपूर्ण वणी शहरातील समस्या नगरपालिका प्रशासनासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण आणि मूलभूत सुविधांबाबत त्यांनी सातत्याने निवेदने देत प्रशासनाला जागे केले आहे.

भाजप नेतृत्वाने हा निर्णय घेताना जातीय समतोल, सामाजिक समीकरण आणि अनुभव यांचा योग्य मेळ साधल्याचे स्पष्ट होते. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काही प्रमाणात भाजपपासून दुरावलेला कुणबी समाज, वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्या विश्वासाला बळ देण्यासाठीच लक्ष्मण उरकुडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उपाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना लक्ष्मण उरकुडे म्हणाले,

“या जबाबदारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पहिल्या अडीच वर्षांत राकेश भाऊ बुग्गेवार उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील आणि त्यानंतर मला संधी मिळेल. वणी शहर विदर्भातील सुंदर, सुव्यवस्थित आणि दर्जेदार शहर बनावे, हे माझे स्वप्न आहे.”

या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, राकेश बुग्गेवार आणि लक्ष्मण उरकुडे या दोघांनाही नागरिक, कार्यकर्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. वणी नगरपालिकेत भाजपचा हा निर्णय आगामी काळात स्थैर्य, समन्वय आणि विकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए