Homeक्राइमसिटी हब मीडिया वणीच्या बातमीची दखल; नांदेपेरा रोडवरील धोकादायक वीज खांबांवर नगरसेवक...

सिटी हब मीडिया वणीच्या बातमीची दखल; नांदेपेरा रोडवरील धोकादायक वीज खांबांवर नगरसेवक अजय धोबे आक्रमक!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

सिटी हब मीडिया वणीच्या बातमीची दखल;

नांदेपेरा रोडवरील धोकादायक वीज खांबांवर प्रशासन मौन, नगरसेवक अजय धोबे आक्रमक…

वणी शहरातील नांदेपेरा रोडवरील साई मंदिर चौक ते रेल्वे क्रॉसिंग दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका ठरत असल्याचा मुद्दा सिटी हब मीडिया वणीने बातमी व व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर हा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे. या बातमीची दखल घेत नगरसेवक अजय पांडुरंग धोबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कडक शब्दांत निवेदन सादर करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.

हा परिसर प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येतो. यापैकी एका नगरसेवकाने अलीकडे या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असली, तरी उर्वरित तीन नगरसेवक अद्यापही जागृत झालेले दिसत नाहीत. नागरिकांच्या गंभीर समस्येबाबत त्यांची भूमिका सध्या उदासीन असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.या रस्त्यावरून दररोज शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मॉर्निंग-इव्हनिंग वॉक करणारे नागरिक, तसेच ग्रामीण भागातून येणारी-जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हे थेट अपघाताला आमंत्रण देणारे ठरत असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरसेवक अजय धोबे यांना दिलेल्या माहितीनुसार, वीज खांब हटविण्यासाठी आवश्यक ती रक्कम विद्युत मंडळाकडे आधीच जमा करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही केलेली आहे. मात्र असे असतानाही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात का झाली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

विद्युत मंडळाचा ठेकेदार काम सुरू करत नसताना, त्याला जाब विचारणारा कोण, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पीडब्ल्यूडी, विद्युत मंडळ, ठेकेदार, नगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी — सर्वच यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

“जर या हलगर्जीपणामुळे एखादी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग आणि प्रशासनावर राहील,” असा थेट इशाराही नगरसेवक अजय धोबे यांनी दिला आहे. तातडीने खांब हटवण्यात आले नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलन, माध्यमांतून आवाज उठवणे तसेच वरिष्ठ व न्यायालयीन स्तरावर दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे वणी शहरातील नागरिकांच्या मनात ‘प्रशासन लोकांच्या जीवांशी खेळ करत आहे’ अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. ही असंतोषाची भावना केव्हा उफाळून येईल, याचा अंदाज सध्या कोणीही लावू शकत नाही. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए