सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी-वरोरा राज्यमार्गावर बुधवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम मिस्री म्हणून काम करणारे वांजरी (ता. वणी) येथील रहिवाशी प्रदीप रमेश ठमके (३१) हे आपल्या ‘स्प्लेंडर’ दुचाकीने (क्रमांक: MH 29 B 0963) आपले साथीदार अनिल बाबाराव कुत्तरमारे वय ४० वर्षे (मानकी रहिवाशी) सोबत शेंबळ या गावाकडे जात होते. दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास पाटाळा पुलाजवळ मागून येणाऱ्या एका सिल्व्हर रंगाच्या ‘स्विफ्ट’ कारने (क्रमांक: MH 14 GD 6835) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार अनिल कुत्तरमारे यांचा जागीच मृत्यू झाला, व प्रदीप ठमके हे गंभीररित्या जखमी झाले, धडक दिल्यानंतर कारवरील ताबा सुटल्याने कारने रस्त्याखाली ३-४ कोलांटउड्या घेतल्या आणि ती शेतात जाऊन कोसळली.
मृतांची आणि जखमींची माहिती…
मृत्यू: दुचाकीस्वार प्रदीप ठमके यांचा वरोरा येथील रुग्णालयात व अनिल कुत्तरमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनिल कुत्तरमारे यांच्या मागे परिवारात आई,पत्नी,दोन लहान मुलगा, मुलगी आहे.
मृतक अनिल कुत्तरमारे…
कारमधील जखमींना वरोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्या गले आहे अशी माहिती आहे…
जखमी: कारमधील इतर दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रवासी मारेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते.
मदतकार्य आणि पोलीस तपास…
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अनिल कुत्तरमारे यांचा मृतदेह ‘सागर वंजारी’ यांच्या रुग्णवाहिकेने वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला, तर कारमधील जखमींना टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेने तात्काळ वरोरा येथे हलवण्यात आले.
सध्या वणी पोलीस या अपघाताचा सविस्तर तपास करत असून, कारमधील इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






