सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
अखिल ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव २०२६ वणी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘भगवान परशुराम जन्मोत्सव आयोजन समिती, वणी’ तर्फे विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

योजना शिबीर आणि मार्गदर्शन…
जन्मोत्सवाचे औचित्य साधून शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत विशेष ‘योजना शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. अमृत व परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे शिबीर पार पडेल. यात खालील विषयांवर मार्गदर्शन व प्रक्रिया पूर्ण केली जाईल:

विविध शासकीय योजनांची माहिती…
ई.डब्ल्यू.एस (EWS) व इतर आवश्यक कागदपत्रे प्रक्रिया.
योजना अर्जांची प्रत्यक्ष पूर्तता.
भक्तीमय प्रवचन सोहळा…
१८ एप्रिल रोजीच रात्री ७ ते ८:३० या वेळेत ‘भगवान श्री परशुराम अवतार कार्य’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. श्री. मनू महाराज तुगनायत आपल्या रसाळ वाणीतून मार्गदर्शन करणार आहेत.
भव्य बाईक रॅली आणि स्नेहभोज…
रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जैताई मंदिर, वणी येथून भव्य ‘बाईक रॅली’ काढण्यात येणार आहे. या रॅलीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे. तसेच, रविवारी रात्री ८ वाजता जैताई मंदिर येथेच ‘स्नेहभोजा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना सर्व ज्ञाती बहुभाषीक ब्राह्मण बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, अशी विनंती भगवान परशुराम जन्मोत्सव आयोजन समिती, वणी यांनी केली आहे.
स्थळ: जैताई मंदिर, वणी.
प्रमुख आकर्षण: अमृत व परशुराम महामंडळ योजना शिबीर.
दिनांक: १८ आणि १९ एप्रिल २०२६.

























