Homeमहाराष्ट्रआरोग्य सभापतींच्याच प्रभागात अस्वच्छतेचा बोजवारा; नियमितपणे स्वच्छता होत नसल्याचा नागरिकांचा आरोप!!

आरोग्य सभापतींच्याच प्रभागात अस्वच्छतेचा बोजवारा; नियमितपणे स्वच्छता होत नसल्याचा नागरिकांचा आरोप!!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

शहराच्या स्वच्छतेची आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नाकाखाली स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे धक्कादायक चित्र प्रभाग क्रमांक १० मध्ये पाहायला मिळत आहे. या प्रभागाचे प्रतिनिधित्व स्वतः नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक अनिल चिंडालिया आणि दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नगरसेविका आरती वांढरे करत आहेत. मात्र, एवढे वजनदार लोकप्रतिनिधी असूनही या प्रभागातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

आमदारांच्या घराजवळच दुर्गंधीचे साम्राज्य…

विशेष म्हणजे, आमदार संजय देरकर यांच्या घराजवळच ही मुख्य कचराकुंडी आहे.(येमुलवार व राजुरकर यांच्या घरांच्या मधात)आमदार, आरोग्य सभापती आणि अनुभवी नगरसेविका असा मोठा लवाजमा या प्रभागात वास्तव्यास किंवा संपर्कात असतानाही नगरपरिषद प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.तसेच जवळच आदर्श माध्यमिक शाळा आहे तिथूनच शेकडो विद्यार्थी येणे जाणे करतात त्यांच्या आरोग्यावर ही घाणीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे…

पावसाळ्यात परिस्थिती बिकट, घरात राहणेही कठीण…

सध्या येथील कचराकुंडी नेहमीच घाणीने आणि ओल्या-सुक्या कचऱ्याने माखलेली असते. कचराकुंडीची खोली जास्त असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी, कचरा कुजल्यामुळे परिसरात प्रचंड तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

पाऊस आला की हा सर्व कचरा पाण्यात वाहून थेट मुख्य रस्त्यावर येतो.

वाऱ्यामुळे प्लास्टिक आणि इतर कचरा उडून थेट स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर जनावरांचा (गुरेढोरे) मुक्त संचार असतो, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची भीतीही वाढली आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

पाणी साचून राहिल्याने या भागात डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, हिवताप (मलेरिया) आणि गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचे सावट पसरले असून, स्थानिक बालकांचे व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

निवेदने कचऱ्याच्या टोपलीत? नगराध्यक्षांकडेही साकडे…

या गंभीर समस्येबाबत त्रस्त नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा लेखी निवेदने दिली आहेत. स्वतः नगराध्यक्ष विद्याताई आत्राम यांची भेट घेऊन त्यांनाही या समस्येचे गांभीर्य समजावून सांगत त्वरित कारवाईची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“स्वतः आरोग्य सभापती ज्या प्रभागात राहतात किंवा प्रतिनिधित्व करतात, तिथेच जर अशी नरकयातना नागरिकांना सहन करावी लागत असेल, तर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा देवच जाणे! प्रशासनाने तात्काळ ही कचराकुंडी साफ करून योग्य नियोजन करावे…स्थानिक रहिवासी,प्रभाग क्र. १०

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए