माजी आमदार विकासपुरुष श्री संजीवरेंडी बोदकुरवार यांचा वाढदिवस आज – सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव…
वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. संजिवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे. सकाळपासूनच नागरिक, कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी व समाजघटक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
विकासाची गाथा
आमदारकीच्या काळात वणी विधानसभा क्षेत्रासाठी २००० कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला.
रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन प्रकल्प, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात लक्षणीय कामगिरी.
शेतकरी, युवक व व्यापारी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून विकासाला दिली गती.
राजकीय व सामाजिक प्रवास
१९९२ मध्ये झरीजामणी तालुका महामंत्री पदापासून राजकीय वाटचालीला सुरुवात.
तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी जबाबदारी.
२०१४ ते २०२४ – वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून दमदार कामगिरी.
मनोगत
वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त करताना मा. संजिवरेड्डी बोदकुरवार म्हणाले : “जनतेच्या आशीर्वादाने मला विकासकामांची संधी मिळाली. राजकारण म्हणजे सेवा असून माझे आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित आहे. पुढेही मतदारसंघातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
शुभेच्छांचा वर्षाव
विविध कार्यकर्ते, सामाजिक संघटना व नागरिकांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणावर अभिष्टचिंतन.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे…
—
🌸 जनतेच्या मनात घर करणारे व विकासाभिमुख कार्य करणारे लोकप्रिय नेते मा. संजीवरेंडी बोदकुरवार यांना सिटी हब मिडिया तर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸

























