वणी, २६ सप्टेंबर २०२५: आज सकाळी सुमारे ६:१५ वाजता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारातील बस क्रमांक MH 40 AQ 6062 चा चालक शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ग्राम बोर्डा जात असताना अपघात टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे एक प्रकरण समोर आले.
विरकुंड ते बोर्डा मार्गावर एका शेताजवळील रोडवर समोरून येणाऱ्या मोटरसायकल चालकाने बस चालकाला अडथळा निर्माण केला. बस चालकाने रस्ता दिला असता, मोटरसायकल चालकाने फुकटची नौकरी लागल्याचा आरोप करत शिवीगाळ केली. यानंतर मोटरसायकल चालकाने बस चालकाचा कॉलर पकडून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
बस चालकास मदतीस आलेल्या वाहक संजय नान्ने चालकाच्या मदतीला धावून आले मात्र मोटरसायकल चालकाने लाकडी काठीने बस चालकाच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली.
मोटरसायकल चालकाचा क्रमांक MH 29 BW 8150 असून, त्याचे नाव पायघन, रा. बोरडा आहे. बस चालकाने ही घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम 132,121(1),352 अंतर्गत गुन्हा दाखल करून वणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

























