Homeविदर्भनागपुरविश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे डॉ. प्रणाम सदावर्ते...

विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे डॉ. प्रणाम सदावर्ते…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे
डॉ. प्रणाम सदावर्ते…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामुळे चारित्र्यवान व्यक्तींची निर्मिती होत असते. आज संघाच्या प्रेरणेने भारतासह जगातील विविध 60 देशात दोन लाखापेक्षा अधिक सेवा प्रकल्प सुरू आहेत. भारतीय आचार–विचार व जीवन पद्धती जगाचे मार्गदर्शक बनून कल्याण करू शकते. विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे. असे रोखठोक प्रतिपादन सेवांकुर प्रकल्पाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रणाम सदावर्ते यांनी केले. ते वणी नगरच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थान भांडेवाडा येथील अध्यक्ष बबनराव झोलबाजी धानोरकर हे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत. व नगर संघचालक किरण बुजोने उपस्थित होते.
आपला विषय मांडताना डॉ. सदावर्ते म्हणाले की, आपण विजयादशमी उत्सवात शस्त्रांचे केले जाणारे पूजन हे आपल्या पराक्रमाची व शौर्याची आठवण करून देते. आज पासून 100 वर्षापूर्वी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी भारत मातेच्या पुत्रांमधील चिंतेची न्यूनगंडतेची भावना काढून टाकून व्यक्ती निर्माणातून राष्ट्राच्या पुन: ऊत्थानाचे काम सुरू केले. या द्वारे डॉ. मी हिंदुत्वाच्या विचारांना पुनर्जागृत करण्याचे काम केले. त्या कामाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. व्यक्तीमध्ये दोष असू शकतात. त्यामुळे त्यांनी भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवले.
संघात व्यक्ती निर्माणाचे केंद्र ही संघाची शाखा आहे. यातून निर्माण झालेल्या चारित्र्यवान स्वयंसेवकामुळे व्यवस्था परिवर्तन शक्य झाले. यातून कोणाचे अहित न करता विश्व कल्याणासाठी आपल्याला विश्वगुरु व्हायचे आहे.
शताब्दी वर्षात संघाने पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे. यातून कुटुंब व्यवस्था बळकट करणे. नागरिकांना नागरी कर्तव्याचे पालनाचे महत्व सांगणे. पारदर्शक आर्थिक व्यवहार, पर्यावरणाचे संतुलन राखणे. सामाजिक समरसता निर्माण करणे. स्वदेशी आचरण या सर्वासाठी जागरण करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
या प्रसंगी पाहुण्याचा परिचय, प्रास्ताविक नगर संघचालक किरण बुजोने यांनी केले. सांघिक गीत ॲड . प्रेमकुमार धगडी, सुभाषित शंतनु पिंपळकर अमृत वचन कृष्णकुमार पानेरी, वैयक्तिक गीत प्रवीण सातपुते यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शिक्षक कवडू पिंपळकर यांनी केले.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए