वडगाव (टीप) मार्गावर गजानन नगरी लेआऊट मध्ये आढळला मृतदेह.
एका युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरुन तसेच डोक्यावर वार करुन हत्या करण्यात आली. वणी ते वडगाव (टीप) मार्गावर गजानन नगरी लेआऊट मधील सुनसान जागेवर ही घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता उघडकीस आली. मृतकाचे वय अंदाजे 25 ते 27 वर्ष आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. युवकाचा खून गुरुवारी रात्री दरम्यान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बातमी लिहेपर्यंत फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहचले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे…
खून करण्यात आलेल्या युवकाची ओळख पटली आहे, मात्र पोलिसांनी अद्याप त्याचे नाव उघड केले नाही.
📌 अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.

























