सिटी हब मीडिया
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून विजय चोरडिया यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती 🟧
वणी – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होत, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने वणी तालुक्यातील विजय चोरडिया यांची जिल्हा संघटक (कार्यक्षेत्र –यवतमाळ, वणी व राळेगाव विधानसभा) म्हणून नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी संजय पुष्पलता भागोजी मोरे (शिवसेना सचिव) यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे यवतमाळ,वणी तालुका व राळेगाव विधानसभा क्षेत्रात शिवसेना संघटनाला नवी ऊर्जा मिळणार असून, पक्षविस्तारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजय चोरडिया यांनी नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की,
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन, शिवसेना पक्षासाठी तनमनाने कार्य करण्याचा माझा निर्धार आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा प्रत्येक घरावर फडकवण्यासाठी मी अथक प्रयत्न करीन.”
शिवसेना नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला आहे की विजय चोरडिया हे संघटन बळकट करण्यास, पक्षविस्ताराला वेग देण्यास आणि शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्यास मोलाची भूमिका निभावतील.

























