RCCPL MP Birla सिमेंट कंपनी मुकुटबन येथे आयटकतर्फे बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात…
वणी-मुकुटबन
मुकुटबन येथील RCCPL MP Birla सिमेंट कंपनीतील कामगारांनी आज सकाळी पाच वाजेपासून आपापल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) तर्फे घेण्यात आले असून, आंदोलनाचे नेतृत्व प्रखर आणि लढाऊ नेते कॉ. अनिल हेपट यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
कामगारांनी या आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. कंपनी प्रशासनाला पूर्वीच दिलेल्या अल्टिमेटममध्ये खालील मागण्या करण्यात आल्या होत्या —
कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे.
कामाचे तास हे कामगार संहिता नियमांनुसार निश्चित करण्यात यावेत.
कामाचे वातावरण आणि सुविधा कामगारांसाठी अनुकूल ठेवण्यात याव्यात.
या प्रमुख मागण्यांकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कामगारांनी सकाळी पाच वाजल्यापासून उत्पादन थांबवून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अनिल हेपट यांच्यासह अनिल घाटे, मोरेश्वर कुंटलवार, दिनेश शिटलवार, पंढरी नांदेकर, प्रविण कुळेकर, अनिल मोंडे, महादेव मेश्राम, कवडू केळझरकर, रोषण चामाटे, कलीम शेख, निरज खैरकर, अक्षय पुल्लीवार आदी करत आहेत.
कामगारांचे म्हणणे आहे की, “आमच्या योग्य मागण्यांकडे कंपनी प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”

























