प्रभाग १ चा विकास म्हणजे नितीन चहानकरांची ओळख – पुन्हा उमेदवारीची चर्चा सुरू…
वणी, दि. ७ नोव्हेंबर
२०१६ च्या वणी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक १ मधून नितीन चहानकर यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी प्रभागात कामाचा डोंगर होता, पाय ठेवला तिथे चिखल, मूलभूत सोयींचा अभाव — अशा परिस्थितीत नितीन चहानकर यांनी खंबीरपणे विकासाची वाटचाल सुरू केली आणि प्रभागाचा चेहरामोहरा बदलला.
त्यांच्या कार्यकाळात दोन पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाईनचे काम पूर्ण झाल्याने प्रभागातील बहुतांश नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागला. तसेच चार आकर्षक बगीचे — रवी नगर, आयटीआय कॉलनी, गुरुवर्य कॉलनी आणि जिल्हा परिषद कॉलनी — उभारण्यात आले. प्रभागातील मुख्य रस्ते सुधारण्यात आले, सांडपाण्याच्या उघड्या नाल्या बंद करून “नालीमुक्त प्रभाग” करण्याचा मान चहानकर यांच्या कार्यकाळाला मिळाला.
प्रभागभर LED पथदिव्यांची स्थापना स्वतः उपस्थित राहून करण्यात आली. नागरिकांच्या छोट्या-मोठ्या अडचणींवर तत्काळ प्रतिसाद देणारा, एका फोनवर धावून जाणारा नगरसेवक म्हणून नितीन चहानकर यांची ओळख निर्माण झाली आहे.
सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रभागी राहणारे नितीन चहानकर आता पुन्हा एकदा प्रभाग १ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या पुनरागमनाबद्दल उत्सुकता असून, “विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणारा नेता पुन्हा येणार” अशी चर्चा सुरू आहे.
📍City Hub Media


























