सिटी हब मीडियाच्या बातमीचा प्रभाव:
आमदार संजय देरकर वणी आगारात, जीवघेण्या रस्त्याची पाहणीसाठी एसटी-सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज…
वणी, कोरपना, गडचांदूर, ढाकोरीबोरी, कुरई, आबाईफाटा, शिरपूर या मार्गावरील रस्त्यांची झालेली जीवघेणी दुरावस्था लक्षात घेता वणी आगार प्रशासनाने या मार्गावरील एसटी सेवा बंद केल्या आहेत. या निर्णयामुळे शेकडो प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले असून प्रवास अत्यंत धोकादायक ठरला आहे.

या मार्गावर काही ठिकाणी इतके मोठे खड्डे पडले आहेत की, केव्हाही मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे वणी आगाराने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आणि यासंदर्भात विभागाला पत्रव्यवहार केला.
सिटी हब मीडियाने या संदर्भात सविस्तर बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीची दखल घेत आमदार संजय देरकर स्वतः संध्याकाळी वणी आगारात पोहोचले. त्यांनी आगार व्यवस्थापक विवेक बन्सोड यांच्याशी चर्चा करत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने बोलावले आणि रस्ता दुरुस्तीबाबत सूचना दिल्या.
आज एसटी विभागाची एक टीम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एसटी बसमधून प्रत्यक्ष या रस्त्यांची पाहणीसाठी घेऊन गेली आहे. अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, या पाहणीनंतर अधिकाऱ्यांना परिस्थितीची गंभीरता उमजेल आणि तातडीने दुरुस्तीचे काम सुरू होईल.
स्थानिक प्रवासी आणि विद्यार्थी वर्गात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे की,
“रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होऊन पूर्ववत एसटी सेवा सुरू होईल…

























