सिटी हब मिडिया
समाजसेवा हिच ईश्वरसेवा फाऊंडेशन, वणी आणि कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने मा. हंसराजभैय्या अहीर, अध्यक्ष – ओबीसी मागासवर्गीय आयोग, भारत सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार असून, स्थळ – गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना सभागृह, सावर्ला असे आहे.
या शिबिरात अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदूचे निदान तसेच आवश्यक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येणार आहे. नागरिकांना या शिबिराचा मोफत लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा उपक्रम भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेवा हिच ईश्वरसेवा फाऊंडेशन, वणी यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
“आरोग्य हीच खरी संपत्ती” या ध्येयाने प्रेरित हा उपक्रम जनतेसाठी एक मौल्यान्वित सेवा ठरणार असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
सिटी हब मिडिया वणी…

























