Homeमहाराष्ट्रवणीत गुलाबी थंडीतच राजकीय तापमान भडकले — अंकुश बोढे यांचा भाजप प्रवेश...

वणीत गुलाबी थंडीतच राजकीय तापमान भडकले — अंकुश बोढे यांचा भाजप प्रवेश…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मीडिया, वणी

मनसे शहराध्यक्षांचा धडाकेबाज राजकीय यूटर्न; भाजपमध्ये प्रवेशामुळे वणीच्या राजकारणात खळबळ…

 

 

मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी अचानक मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने वणीच्या राजकीय पटावर मोठी खळबळ उडाली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हालचालीमुळे नवीन राजकीय समीकरणे निर्माण झाली असून प्रत्येक पक्षात हलचल सुरू झाली आहे.

मनसे वाढीसाठी एक वर्षाची धडपड, पण…अंकुश बोढे यांनी गेल्या वर्षभरात मनसेचा विस्तार करण्यासाठी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सातत्याने काम केले. त्यांच्या कामगिरीवर आधारित त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. संघटन वाढीसाठी ते सतत सक्रिय होते.

मनसे–उबाठा गट युतीमुळे निर्माण झालेली नाराजी

शिवसेना (उबाठा गट) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनंतर अंकुश बोढे यांच्या मनात नाराजी निर्माण झाली. दोन्ही ठाकरेंच्या पाट्यांवर एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांनी मनसेच्या अंतर्गत समीकरणांमध्ये मोठा बदल जाणवला.या बैठकीत बोढे उपस्थित असले तरी या युतीमुळे त्यांचे राजकीय स्थान कमकुवत होत असल्याचा त्यांना भास झाला.प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असूनही, पक्षाकडून अपेक्षित मान्यता मिळत नसल्याची भावना त्यांच्यात वाढत गेली.अचानक घेतलेला धडाकेबाज निर्णय – थेट भाजपमध्ये प्रवेश…अखेर, अचानकच अंकुश बोढे यांनी यवतमाळ येथे भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या संघटन कौशल्य आणि कार्यक्षमता पाहून भाजपने त्वरित त्यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या प्रवेशावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

वणीतील राजकारणात तापमान वाढलेअंकुश बोढे यांच्या प्रवेशानंतर वणीच्या राजकारणात गुलाबी थंडीऐवजी “निवडणुकीची गर्मी” वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, एक घनदाट कार्यकर्ता आणि पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याची खंत कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “ओबीसी समाजातील प्रभावी नेता भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्ष अधिक मजबूत होणार” अशी चर्चा रंगली आहे.नगरपालिका निवडणूक युद्ध अधिक रंजक?या अचानक झालेल्या राजकीय घडामोडीनंतर वणीची आगामी निवडणूक अधिक रोमांचक झाली आहे.पुढील काही दिवसांत आणखी काही राजकीय हालचाली पाहायला मिळू शकतात, असे संकेत मिळत आहेत.सिटी हब मीडिया लवकरच पुढील अपडेटसह परत येईल. सिटी हब मीडिया, वणी.. 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए