सिटी हब मीडिया / वणी
विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी शहरातील मध्यवर्ती व्यापारी आणि प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १० मध्ये अक्षय राजेंद्रजी बोथरा हे इच्छुक / संभाव्य उमेदवार म्हणून वेगाने पुढे येत आहेत.
स्थानिक व्यापारी वर्ग, तरुणवर्ग आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे, सहज उपलब्ध आणि उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्या नावाभोवती सकारात्मक चर्चा सुरू आहे.
प्रभागातील नागरिकांच्या मते, या वेळी नव्या आणि विकासाभिमुख चेहऱ्याकडे लोकांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय बोथरा यांचे नाव विशेषतः चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.

























