सिटी हब मीडिया / वणी…
प्रभाग क्रमांक ९ मध्ये अब्दुल हफीज अब्दुल सत्तार उर्फ टापू यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क आणि काम करण्याची सहज शैली यामुळे त्यांच्याकडे अनेकांचे लक्ष वळले आहे.
प्रभागात नवा आणि लोकांशी जोडलेला चेहरा हवा असल्याची भावना व्यक्त होत असताना, टापू यांचे नाव अधिक पुढे येत आहे.अब्दुल हाफिज उर्फ टापू यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आपली निरपेक्ष ओळख निर्माण केली आहे तसेच ते आपल्या कडे येणाऱ्या लोकांची मदत करण्यासाठी जाणले जातात…
रमजान ईद च्या पर्वावर भाजी मंडईत त्याच्या तर्फे आयोजित होणारा शिरखुरमा वितरण कार्यक्रम नेहमी चर्चेत असतो…
दरम्यान, सूत्रांकडून अशीही माहिती समोर आली आहे की त्यांना अनेक पक्षांकडून निवडणूक लढण्याची ऑफर आली आहे परंतु ते अपक्ष निवडणूक लढण्यासाठी विचार करत आहेत.
त्यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चेने प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय उत्सुकता वाढली आहे.

























