सिटी हब मिडिया वणी –
सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव गंगाधर सरपटवार (84) यांचे शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शनिवारी स्थानिक मोक्षधाम येथे त्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा शैलेश, मुलगी शिल्पा, सून, जावई, नातवंडे तसेच भावंडं असा मोठा आप्तपरिवार आहे.
श्री जैताई देवस्थान, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ अशा विविध सामाजिक, साहित्यिक आणि धार्मिक संस्थांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अनेक पुस्तकांचे संपादन व लेखन करून त्यांनी साहित्यविश्वात ठसा उमटवला. मितभाषी, सुस्वभावी आणि लोकसंग्रही अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने वणी शहरात तसेच साहित्य-सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

























