वणी नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक 11 : भाजपचा बालेकिल्ला मजबूत, लवली लाल – रेखाताई कोवे आणि विद्याताई आत्राम यांच्या बाजूने प्रचंड जनसमर्थन…
प्रभाग क्रमांक 11 हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वर्षानुवर्षे या प्रभागातील नागरिकांनी कमळावर दाखवलेला विश्वास यंदाच्या निवडणुकीतही अधिक दृढ झालेला दिसतो. भाजपच्या उमेदवार लवली लाल आणि रेखाताई कोवे यांच्या प्रचार मोहिमेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद, त्यांच्या सभांतील उत्साह आणि घरोघरी होणाऱ्या जनसंपर्कामुळे या प्रभागातील राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने जोरदारपणे करते आहे.
लवली लाल आणि रेखाताई कोवे यांच्या चोख प्रचारातून महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले जात आहे. प्रत्येक कॉर्नर सभेत उपस्थित नागरिकांची वाढती संख्या, उमेदवारांबद्दलचा विश्वास आणि उत्साह हे भाजपच्या विजयाचे स्पष्ट संकेत देत आहेत.
भाजपच्या कारकिर्दीत झालेला मोठा विकास शिवाजी महाराज उद्यानाचा उल्लेख आवश्यक…
या प्रभागात भाजपच्या काळातच वणी शहरातील सर्वात मोठ्या बगीच्याची – छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची निर्मिती करण्यात आली. हा बगीचा आज प्रभागातील नागरिकांसोबतच संपूर्ण वणी शहरातील लोकांसाठी विरंगुळा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सर्वाधिक आवडते ठिकाण बनला आहे. या विकासकामामुळे नागरिकांमध्ये भाजपप्रती आणखी विश्वास निर्माण झाला असून, पक्षाच्या कामगिरीचा ठोस पुरावा म्हणून याकडे पाहिले जाते.
पक्ष नेतृत्वाचा थेट पाठिंबा…
या प्रभागातील प्रचार मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी स्वतः भेट देऊन उमेदवारांना मोठे समर्थन दिले. नागरिकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत, प्रभाग क्रमांक 11 मधून कमळाला विक्रमी मतांनी विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्या बाजूने अनुकूल समीकरणे…
या प्रभागात केवळ नगरसेवक उमेदवारच पुढे नाहीत, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्यासाठीही अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. प्रभागातील सकारात्मक कल, लवली लाल–रेखाताई कोवे यांच्या दमदार जनसंपर्काची साथ, आणि भाजपची मजबूत संघटना यामुळे विद्याताई आत्राम यांना या प्रभागातून भरघोस लीड मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विरोधकांमध्ये वाढती अस्वस्थता
लवली लाल व रेखाताई कोवे यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून विरोधकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लढत रंगतदार असली तरी भाजप अनेक पावले पुढे असल्याचे चित्र राजकीय पातळीवर स्पष्ट आहे. प्रभागातील जनता ठामपणे भाजपच्या बाजूने उभी असल्याने विरोधक नामोहरम झाल्याचे दिसत आहे.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचा पारंपरिक प्रभाव, केलेली विकासकामे, उमेदवारांचा दमदार प्रचार आणि नेतृत्वाचा मजबूत पाठिंबा यामुळे कमळ या वेळीही मोठ्या मताधिक्याने फुलण्याची चिन्हे ठळकपणे दिसत आहेत. लवली लाल – रेखाताई कोवे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्या विजयाचा मार्ग अधिकाधिक सुकर होताना दिसत असून, हा प्रभाग भाजपच्या एकूण विजयात निर्णायक ठरणार आहे.

























